तुझा माझा पाऊस
बघ माझी आठवण येते का?
अस सौमित्र सारख विचारणार नाही
तुला ती येतच असेल
खात्री आहे मला..
तुझ्याबद्दल जितकि
किंबहुना थेंबभर स्वताची
कारण पावसात तुझी आणि
तू दिसल्यावर पावसाची आठवण मात्र येतेच...
अस सौमित्र सारख विचारणार नाही
तुला ती येतच असेल
खात्री आहे मला..
तुझ्याबद्दल जितकि
किंबहुना थेंबभर स्वताची
कारण पावसात तुझी आणि
तू दिसल्यावर पावसाची आठवण मात्र येतेच...
हा..अतिशयोक्ति वाटेल
पण तू काही मनाला लावून घेऊ नकोस
तू फक्त आनंद घे,
मनसोक्त भिज, तुझ्या देहभर कोसळू देत ह्या वीजा
मग कदाचित तुलाच साक्षात्कार होईल
तुझ्यातल्या सौन्दर्याचा...
त्या क्षणी बघ,
त्या अंगावरून अलगद गळणाऱ्या थेंबाना
त्या नभातून धरणीला भिडणार्या सरीना
त्या काळ्याभोर ढगाना
बेभान झाली असशील
खात्री आहे मला...
तुझ्याबद्दल जितकि
किंबहुना थेंबभर स्वताची
कारण पावसात तुझी आणि
तू दिसल्यावर पावसाची आठवण मात्र येतेच...
पण तू काही मनाला लावून घेऊ नकोस
तू फक्त आनंद घे,
मनसोक्त भिज, तुझ्या देहभर कोसळू देत ह्या वीजा
मग कदाचित तुलाच साक्षात्कार होईल
तुझ्यातल्या सौन्दर्याचा...
त्या क्षणी बघ,
त्या अंगावरून अलगद गळणाऱ्या थेंबाना
त्या नभातून धरणीला भिडणार्या सरीना
त्या काळ्याभोर ढगाना
बेभान झाली असशील
खात्री आहे मला...
तुझ्याबद्दल जितकि
किंबहुना थेंबभर स्वताची
कारण पावसात तुझी आणि
तू दिसल्यावर पावसाची आठवण मात्र येतेच...
- केतनसिंह सावंत

0 Comments