मी केतनसिंह सावंत.
लहानपणापासून कवितांची वगैरे आवड होती अशातला भाग नाही पण कविता किंवा हे artworks बनवण हे आपल काम नहीं असाच वाटायच
घरात आजी आत्या बाबा सगळेच चित्रकार रांगोळी काढणारे त्यामुळे आवड होती पण पुढे जॉन आपन हेच क्षेत्र निवडू अस वाटल नव्हत. आज स्वताबद्द्ल लिहिताना आठवतय सगळ। पण ह्या सगळ्यात मी आज ह्या क्षेत्रात उतरलो ते फ़क्त आणि फ़क्त माझ्या बापू आई आणि मामांमुळे त्यानी माझ्यात हा आत्मविश्वास निर्माण केला आणि म्हणून मी आज artworks बनवू शकतो नाही मी जे काही बनवतो ते सगळ माझा बापू माझ्या हाताला धरून माझ्याकडून बनवून घेत असतो तसाच कवितांच्या बाबतीत सुद्धा माझ्या कडून सगळ काही माझा बापूच लिहून घेतो अगदी १०८%
माझे काही छंद असे आहेत ज्यामुळे बरेच जण घाबरतात् ते म्हणजे मला साप पकडायला आवडत. मी स्वत: सगळ्यात आधी एक साप पकडला होता आरे कॉलोनी मध्ये आणि घरी सांगितल पण घरचे कोण विश्वास ठेवायला तैयार नाही मग काय ठरवलच पुन्हा मिळाला तर घरीच घेऊन यायचा बापू कृपेने लवकरच ही संधि मिळाली. कॉलेज वरुण घरी जात असताना एक दिवशी स्टेशन ला काही कामनिमित्त गेलो होतो तेव्हा बाजूच्या दुकानात काही लोक काही घेऊन मारत होते थोडासा अंदाज आला म्हणून पुढे जाऊन बघितला तर म्हणाले साप आहे. मी म्हणालो मारू नका मी पकडतो आणि घेऊन जातो बोले ठीक आहे…पण असली आहे म्हणून घाबरतच बापूंच नाव घेत आधी नीट बघितल तर धामण होती बाहर काढली तर चांगली ४ फुटाची होती मग काय भरली गोणित आणि आणली घरी.
मग जाम ओरडा खाल्ला तर असा आहे मी
https://www.facebook.com/video.php?v=278619862192185&set=vb.100001325210765&type=3
ही लिंक बघा

0 Comments