एक होता कार्व्हर

                           नुकतच  एक पुस्तक वाचून झाल. खरतर बापूंच्या आदन्येने ते घेतले, आणि घेतल्या दिवसापासूनच झपाटल्या सारख वाचत होतो. लहानपणी शाळेच्या ग्रंथालयात "ते" पुस्तक होत  आणि काही मित्रानी  वाचल देखील होत  पण त्यावेळेस वाचनाची म्हणावी तितकी आवड नव्हती म्हणून आजपर्यंत आपण एवढ सुंदर  पुस्तक वाचल नाही ह्याचा निश्चितच पश्चाताप झाला ; आणि हळहळ वाटली की इतकी वर्ष आपण  एवढ्या सुंदर पुस्तकापासून लांब राहिलो.
            "एक होता कार्व्हर".  अम्बद्न्य  बापू आज तुम्ही एक वेगळ्या,विलक्षण,चतुरस्त्र, शांत, प्रसन्न, देवावर प्रचंड विश्वास असणाऱ्या एक वेगळ्याच रसायनाशी ओळख करुन  दिली, कदाचित तुम्ही सांगितल नसत तर कधी वाचल पण नसत आणि एक वेगळ्याच आनंदाला मुकलो असतो. काय नाही ह्या पुस्तकात,  आपल्या जन्मदात्या आईच साधा चेहराही आठवत नाही, आयुष्यभर कायम गोऱ्यांकडून अवहेलना, हेटाळणीच  वाट्याला आलेली पण त्याच कधी  वाईट  वाटून न घेता आपण  ह्या समाजाच काही देण लागतो, ह्या परमेश्वराने  आपल्याला जे कार्य करायला पाठवल आहे त्यामध्ये  ह्या असल्या गोष्टी आड़ येऊन चालणार नव्हत. त्याना स्पष्टपणे दिसत होती ती आपल्या बांधवांची तळमळ, त्यांच्यासाठी धडपडत  होते ते…
                                    पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती  म्हणजे आपल्या मूल्यांना ते आयुष्यभर धरून  राहिले, कुठल्याही परिस्थित त्यांनी तडजोड केली  नाही, ह्या महान शास्त्राद्न्याला  माझा मन:पूर्वक सलाम…काय नाही ह्या पुस्तकात, विद्न्यानाची कास धरणाऱ्याना विद्न्यानाची खाण   आणि आस्तिकांसाठी तर ह्या परमेश्वरावर आपला विश्वास कसा ठेवावा ह्याच हे जिवंत उदाहरण आहे. आजच्या जगात अध्यात्माची कास धरणाऱ्याना हे "अतिप्रगत"विद्न्यानवादी जसे हिणवतात अशा  लोकांनी हे पुस्तक वाचाच  म्हणजे आपल्या कड़क कॉलर ची मोठेपणाची जी कड़क इस्त्री आहे ती आपोआप गळून पडेल आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस,प्रत्येक क्षण हां कार्यमग्नच राहून व्यतीत झाला आणि तो परमेश्वराने पाठवलेल्या कार्यासाठीच झाला ह्याचा त्याना कायम आनन्द… त्यांच्या वाटचालीत मोलाची साथ लाभली ती  सुझन बाई, मोझेस बाबा, मारिया आत्या, ड़ॉ. वॉशिंगटन  इ, अनेक माणसानी त्याना खुप मदत केली  आणि त्या प्रत्येकाचे उपकार ते कधीही विसरले नाहीत , ते कायम कृतदन्य  होते (अम्बद्न्य  होते)....
                          आयुष्याच्या शेवटापर्यंत  शोध चालूच होता. अष्टपैलू व्यक्तिमत्वाच आयुष्य  मी संक्षिप्त रुपात वाचल आणि त्यांच्या अफाट कार्याची जाणीव झालि. लेखिका "वीणा गवाणकर" यानी अतिशय उत्तम रीतीने "कार्व्हर" आपल्यासमोर मांडले आहेत त्याबद्द्ल लेखिकेच कौतुक कराव तेवढ थोड़च आहे..... पुस्तकाबद्द्ल अजुन काही लिहित नाही, प्रत्येकाने ह्या पुस्तकाचा लाभ घ्यावा आणि ह्या थोर शस्त्रद्न्याने आपल्या संपूर्ण  मानव जातीवर किती उपकार केले आहेत याची जाणीव ठेवावी …बापुराया खरच आज तुझ्यामुळेच मी  ह्या शास्त्रदन्याला  भेटू शकलो ……


Post a Comment

0 Comments