सफर कैलीग्राफी जगताची

                           बऱ्याच दिवसा नंतर तुम्हा सगळ्यांशी कैलीग्राफी वर  बोलतोय, छान  वाटतय  तर आपण  होतो की प्रैक्टिस करायची त्यानुसार आपण  पुन्हा थोडीशी उजळणी करून  घेऊ की आपल्याला वळणदार अक्षर आणि सुंदर  कैलीग्राफी साथी ह्याचा सराव करण खुप महत्त्वाच  आहे.
               "अ", "आ" "ए" पासून सुरु करून  आपल्याला सगळ्या मराठीतल्या अक्षरांचा सराव असला पाहिजे. गमतीची गोष्ट  अशी की सराव करताना विचार करायचा की आपण  जे गिरवणार  आहोत ते माझ्या देवबाप्पाला आवडल पाहिजे मग आपोआपच आपल अक्षर सुंदर  येणारच  तर आता पुढे जाउया; सध्या अजुन एक प्रकारची कैलीग्राफी बघायला मिळते  ज्यात टी कैलीग्राफी कागदावर हाताने  केली  जाते आणि मग ती  स्कैन करून संगणकावर (computer ) तीला  इफ़ेक्ट दिला जातो  फोटोशॉप, corel  draw  मध्ये…
                    तसेच  आता आपल्याला बऱ्यापैकी जर  कैलीग्राफी ची ओळख झाली असेल तर हातात ब्रश घेऊन कागदावर कैलीग्राफी चा श्री गणेशा करायला हरकत नाहि… पहिल्यांदा सुंदरच होईल अस धरून चालु नका. पं  बनवताना एकच लक्षात ठेवा की "मी  जे बनवतोय ते माझ्या देवाला आवडल पाहिजे" ह्या भावनेने बनवा मग सगळच सोप्प होइल,काही अडचण  आल्यास बिनधास्त विचारा  आपल्या प्रश्नांची मी  माझ्या परीने  उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करीन.
(ही डिजिटल कैलीग्राफी आहे. ही इमेज करण्यासाठी adobe  illustrator  आणि adobe  photoshop  चा वापर करण्यात आला आहे)

Post a Comment

0 Comments