सावळ्या, तुझे नि माझे अजून जुनेच आहे नाते






ओळख नसली  तरी , भाव एकच आहे
बघ माझ्या "आरशात" अजुन  तुझाच चेहरा आहे.…

असा  विरह जाणवे  की, शब्दही अबोल व्हावे
जरी  तो पांडुरंग उभा पंढरी, परी  स्पर्शे न चंद्रभागे....…

असे  आम्ही भाग्यवंत जे, वंदी दोघांना
बाळ  तुझाच आलो जवळी , आता कुशीत घे……

बघ  फिरुनी  राउळी , घुमताहेत  नाद नामाचे
ऐक  सांगतो "हाक" त्यातील माझीही एक आहे……

जसा  तू पंढरी तसा, मी  माझ्या मनी  राहे
म्हणून म्हणतो सावळ्या, तुझे नि  माझे अजून  जुनेच आहे नाते………
(आरशात = मन, हाक = साकड़)
-  केतनसिंह सावंत
  

Post a Comment

0 Comments