देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता.. उघड दार देवा...
अनेक वर्षांपासून हे गाण ऐकत होतो पण गेल्यावर्षी म्हणजेच १३ डिसेंबरला याचा अर्थ कळला. माझ्यासकट तिथे उपस्थित असलेल्या अनेक जणांच्या देहाची तिजोरी भरली गेली आणि तेव्हा पासून भरत चाललीय. खरच आयुष्याला ३६० अंशामधे बदलयाच म्हणजे काय आणि तेहि आपल्या नकळत माझा सद्गुरु बापूच करू शकतो अगदी १०८%.
![]() |
| फोटो सौजन्य : आरोग्यम सुखसंपदा वेबसाइट |
ह्या ३ तासात बापुनी आमच्यासाठी जीतकी उचित माहिती देता येईल तितकी दिली. खरच ह्या प्रवचनाच्या आधी थोड़े महीने "ड" जीवनसत्त्वाच महत्त्व सांगून टेस्ट करायला लावल्या आणि नंतर कळल की प्रत्येकाच्या शरीरात "ड" जीवनसत्त्वाच प्रमाण मर्यादपेक्षा खूपच कमी होत, जे शरीराला हानिकारक होत.
बापू एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी प्रवचानात सांगितलेली सगळी माहिती "आरोग्यम सुखसंपदा" ह्या वेबसाइट द्वारे सगळ्यांसाठी खुली केली.
बापू अजब रसायन आहे.. हा खरोखरच वेगळा आहे.. डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (एम. डी.).... १३ डिसेंबर दिवस प्रत्येक बापूभक्ताच्या आणि डॉ. म्हणून बापूंना ऐकायला आलेल्या प्रत्येकाच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला... अजुन सुद्धा आपण ही माहिती वाचून आपल्या जीवनात बदल घडवू शकतो... The Ball is in our court now...
अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या लिंक वर दयाAarogyam Sukhsampada
- केतनसिंह सावंत

0 Comments