मी नेहमी स्वताशी बोलायचो
तीच बरोबर की माझ बरोबर?
पण शेवटी तिचच म्हणण
ठरायच खरोखर
तिच्या हाताच्या सुरकुत्या आणि
माझ्या पैंटच्या चुण्या समानच असतील
फक्त तिच्या हातात वर्षाचा अनुभव
आणि माझ्या पैंट ला कळलेला लोकलचा स्वभाव
इतकेच फरक असतील
फार काही नाही दिले तिला एक प्रेमाशिवाय
आणि तीनेसुद्धा कधी मागितले नाही
माझ्या विश्वासपूर्ण हाताशिवाय
- केतनसिंह सावंत

0 Comments