सफर कैलीग्राफी जगताची - ४



                            साधारणपणे कैलीग्राफी करताना मूळ  लक्षात घ्यायच्या गोष्टींबद्द्ल आपण  आधीच बोललो होतो तरी  पुन्हा  एकदा आपण  उजळणी करुया:

१) सगळ्यात महत्त्वाची "आवड"
२) अक्षर लेखनाचा "सराव"
३) क्रिएटिविटी - सतत नवीन  डिज़ाइन बनवण्याची क्षमता  - जी आवडीतून निर्माण होते

आता आपण  थोड़ पुढे जाऊ; आता डिजिटल कैलीग्राफी साठी  सहज वापरता येतील आणि वापरले जातात असे दोन  मुख्य सॉफ्टवेयर्स म्हणजे १) Adobe  Photoshop आणि २) Adobe  Illustrator.
Adobe  Photoshop

Adobe  Illustrator

                       वरील दोन  पैकी आपल्याला दोनही  सॉफ्टवेयर्स ची बऱ्यापैकी ओळख असण  आवश्यक आहे.  जर  तुमचा हात  सहज फिरत असेल तर तुम्ही डायरेक्ट Photoshop मध्ये कैलीग्राफी करू शकता, आणि सरावा साठी तसेच उत्तम स्ट्रोक्स साठी  तुम्ही Illustrator चा वापर करू  शकता. Adobe  Illustrator  मध्ये तुम्हाला अनेक ब्रश वापरासाठी उपलब्ध आहेत म्हणजेच साधारण ४० च्या वर  ब्रश उपलब्ध आहेत आणि आपण  मागेच बोलल्याप्रमाणे एकच ब्रश किंवा एकच स्ट्रोक अनेक प्रकारे  वापरु शकतो;
           
ही Adobe  Illustrator  मध्ये केलेली कैलीग्राफी 
ही कैलीग्राफी मी फ़क्त कॉपी Cntrl C आणि पेस्ट Cntrl V. इतकच केल  म्हणजेच ही कैलीग्राफी मी  Illustrator मधून कॉपी करून Photoshop  मध्ये फ़क्त पेस्ट केली;
ही Adobe  Photoshop  मध्ये पेस्ट केलेली Calligraphy
आता जर तुम्हाला फोटोशॉप ची पूर्ण माहिती असेल तर तुम्ही ह्याला वेगवेगळे इफेक्ट देऊ शकता, आणि अजून नवनवीन डिज़ाइन बनवू शकता, आता आपण डिजिटल कैलीग्राफी कशी करतात ते पाहिल  आता पुढच्या भागात आपण  याबद्द्ल अजून  माहिती घेऊ. 
ही कैलीग्राफी सुद्धा वर  नमूद केलेल्या २ सॉफ्टवेयर्स चा वापर करून  बनवली आहे 

- केतन सावंत

Post a Comment

0 Comments