तुझ्यासाठी.. तुझ्यापासून.. तुझ्यापर्यंत....





तुझ्यासाठी.. तुझ्यापासून.. तुझ्यापर्यंत....

तुझ्यावरच  प्रेम...
तुझ्यावरच्या  कविता....
तुझ्यासोबत मांडलेला डाव...
अन  तुझ्यासाठी मागे सोडलेला गाव....

खोल लागला तू सोडलेला तो "बाण"
तरी अजुन स्मरणात आहे, तुझ्यासाठी घेतलेली "आण"....
तुझ्या वरच्या गझलांचा, बाकी आहे हिशोब सारा...
अन सावरायचा आहे उधळलेला तू, हा डाव सारा...

संवाद मुक्यानेच झाला अपुला
तोही  शेवटचा...
तुझ्यासाठी..
तुझ्यापासून..
तुझ्यापर्यंत...

- केतनसिंह सावंत

Post a Comment

0 Comments