ही दार बंद करून घे

ही दार बंद करून  घे
नक्षत्रांची...
चांदण्यांची...
पोटातून ओठापर्यंत आल्या शब्दांची...
डोळ्यात साठल्या भावनांची...
तुझ्या माझ्यातल्या अंतराची...
तुझ्या भोवती पिंगा घालणाऱ्या वाऱ्याची...
तुळशीवरच्या मंजिरीची..
अंगणातल्या चाफ्याच्या गंधाची..
आणि हो प्राक्तनाची सुद्धा...
कारण..
कारण भीती वाटतेय...
पुन्हा आक्रमण होईल त्या भयंकर सुंदर पावसाच
अन घेऊन जाईल तुला माझ्यापासून लांब.. लांब...
म्हणून म्हणतोय
ही दार बंद करून  घे.... .

- केतन सावंत 

Post a Comment

0 Comments