आश्वस्थ आणि अस्वस्थ मध्ये
फार थोड़ अंतर आहे
'ती' मला जगण्याबद्द्ल आश्वस्थ करते
आणि जगण तिच्या काळजीने अस्वस्थ करत
तेव्हा ह्या तगमगीत 'जीव'नावाच घरट,
ती सोडून जाते, काही 'पिस' घरट्यात सोडून...
....
मग एकटेपणाच "गिधाड"
घर नावाच्या आकाशात घिरट्या मारत राहत
कधीतरी संपेल हां प्रवास, थांबेल हे "धड़"चालण्याच
आणि तृप्त होइन मी
सर्व सुखदुःखाच जेवण करून ह्या आशेने
....
मग फैलावेन आपले पंख
ह्या मर्त्यलोकापासून त्या स्वर्गलोकापर्यंत
आणि मग पावेन उ:शाप
ह्या 'अस्वस्थ' जगण्यातून मुक्त होण्याचा
"आश्वस्थ" होण्यासाठी...
- केतन सावंत

0 Comments