हरि ॐ. साधारण 2 वर्षांपूर्वी ही " नंदाईचा तान्हुला " कविता बापूनी लिहून घेतली. ही कविता फेसबुक वर आली तेव्हा खूप लोकप्रिय झाली.खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स मिलाल्या. पण ही कविता सुचली कशी? आमचा बापुभक्त फ्रेंड्स चा ग्रुप जुईनगर गुरुकुल येथे गेलो होतो. तेव्हा आमच्यासोबत एक अजुन एक बापुभक्त मुलगा आला होता. कुणालसिंह पाटिल.
दर्शन वगैरे झाल. आम्ही निघालो.मग बोलण्या बोलण्यातून त्याला कळल मी कविता करतो. तो म्हणाला "केतन, बघ अस पण होत असेल ना? की जी अनाथ मूल आहेत टी जेव्हा बापूंकडे येतात, आईसोबत धान्ग्डधिंगा मधे रमतात. तेव्हा बापू आई मधे त्याना त्यांचे आई बाबा दिसत असतात.मग ह्या थीमवर एखादी कविता लिहायला जमली तर बघ.." तो बोलून थांबला पण माझ्या डोक्यात बापूनी चक्र फिरवायला सुरुवात केली होती. घरी येइपर्यंत संध्याकाळ झाली होती. सवयी प्रमाणे खिशातून डायरी होती ती काढली आणि चालता चालता लिहू लागलो " कधी कधी संध्याकाळी बसतो उदास.."
पण अवघ्या २ दिवसात कविता तिच्यात करायचे करेक्शन्स करून पूर्ण झाली. आजही लोकांच्या कमेंट्स येतात की " हे खरचअआहे. आणि आज आपण बघतो की बापू आई मामा आपल्यासाठी काय काय करतात. पण एवढ मात्र खर की आपले सख्खे आई बाबा जेवढे आपल्यावर प्रेम करत नसतील त्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रेम हे तिघ करतात. नेहमीच बघायच झाल तर एखादी व्यक्ति जी संकटाना तोंड देऊन हतबल झालेली असते ती फ़क्त एकदा बापुन्च्या दर्शाना ला येते आणि त्यावेळी त्या व्यक्तीला बघून बापू एक गोड स्माइल करतात आणि मग दर्शन झाल्यावर टी व्यक्ति जेव्हा बाहेर येते तेव्हा त्या व्यक्तिच्या डोल्यातला आनंद खूप काही सांगुन जातो. कोणीतरी आपल भेटल की जो मला ह्या संकटातून बाहेर काढेल..मदत करेल. हा विश्वास घट्ट होतो का? कारण तो प्रेमच एवढ करतो की शब्द अपुरे पडतात.
हरि ॐ
।। अंबज्ञ ।।

0 Comments