माझ बालपण सगळ गोरेगाव मध्येच गेल. गोरेगावच्या जयप्रकाश नगर मधील मातृमंदिर ही माझी बालवाडी. त्यानंतर आशाताई गवाणकर ही प्राथमिक शाळा आणि ५ - १० वी नंदादीप विद्यालय..
लहानपणी सकाळ झाली की बाबांच्या स्कूटरवरुन संपूर्ण आरे कॉलनी फिरून यायचो. कधी मॉडर्न बेकरी..कधी पिकनिक पॉइंट...न्यूझीलंड हॉस्टेल..असा सगळा दौरा करून यायचो. आरे कॉलनिची ती थंडी...तिथला वाघोबा ह्या बाबतीत मला खूप कुतुहल होत.अर्थात मी अजुन स्वत: वाघ पाहिला नाही आरे मध्ये..पण अधून मधून पेपर मध्ये वाचायला मिळत आज वाघाने ह्या पाड्या वरच्या मुलाला नेल..वगैरे.
...आरे कॉलनिची मजाच वेगळी होती.पूर्ण हिरवीगार.हा तेव्हापासून फिल्मसिटी होती तिथे अजुनही आहे.बमखाना,न्यूझिलंड हॉस्टेल,आरे मार्केट, गावदेवी मंदिर,छोटा काश्मीर, आरे तलाव आणि बर्याच अशा गोष्टी आहेत ज्या बदलल्या नाहित. हां कालानुरूप त्यानी नव रूप घेतल..पण त्यांच्या सोबतच्या माझ्या आठवणी अजुन तशाच आहेत..काही बदल झाले नव्या इमारती उभ्या राहिल्या..झाड तोडली गेली..
आजही जेव्हा मी आरे मध्ये जातो असाच फेरफटका मारायला.तेव्हा ते सगळ आठवत. मॉर्डन बेकरिच्या त्या उतारावरुन खाली येणारी बाबांची स्कूटर..आणि त्यांच्या पुढ्यात उभा असलेला मी. आतासुद्धा लिहिताना मला तेच डोळ्यांसमोर दिसतय..
आता इथे संदीप खरे च्या एका कवितेच्या ओळी आठवतात.
" उतरून ओझे वयाचे चला रे
पहा कोवले उन्ह बोलावते "
खरच अस ओझ उतरवून ते बालपणीच कोवळ उन्ह आपल्याला घ्यायला हव..
हरी ॐ

2 Comments
very nicely described
ReplyDeleteshreeram
Delete