बेधुंद मी

बेधुंद मी
मनमुक्त मी
उधळून सर्वस्व माझे
हरखून मी
गेले अशी
गुंतूनी गुंत्यात गेले
प्रेमाच्या चांदण राती
बघ सांडिले अश्रु माझे
नि:शब्द हुंकारणारी
मी स्पंदनांचे लेउन ओझे
तुझ्या नयनी भाव सारे  कोंडलेले
अन अपुले अस्तित्व निजत आलेले…  

Post a Comment

0 Comments