शूट आऊट ॲट लोखंडवाला ह्या चित्रपटाच्या शेवटच्या सीन मध्ये अमिताभ बच्चन न्यायमूर्तीना एक प्रश्न विचारतात की तुमच्या घराबाहेर बंदूक घेऊन उभा असलेला व्यक्ती कोण असावं अस तुम्हाला वाटत? तो कुख्यात गुंड असावा की पोलिस अधिकारी?
२६/११ रोजी मुंबईवर झालेला हल्ला आपल्यापैकी कुणीही विसरू शकत नाही. ते दहशतवादी जेव्हा बोटीतून किनाऱ्यावर उतरले तेव्हा त्यांना कुणीही तिथल्या उपस्थीत नागरिकांनी हटकल होतं का?
सगळ्याच गोष्टी पोलीसांवर सोडून देता येत नाहीत याचा अर्थ आपण कायदा हातात घेणं हा नक्कीच नाही पण आपण आपल्या परीने त्यांना मदत करू शकतो? ती म्हणजे आपण सुजाण आणि सतर्क नागरिक बनण. सध्या नीरज कुमार यांनी लिहिलेल्या खाकी फाईल्स हे पुस्तक वाचतोय. गुन्हा कसा घडतो किंबहुना गुन्हा घडू नये म्हणून आपण काय खबरदारी घ्यावी आणि त्यांनी मांडलेल्या गोष्टींमधून गुन्हा घडला तेव्हा काय परिस्थिती होती हे कळतं म्हणजे तशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला तयार होतेय का तपासण आणि त्याबद्दल योग्य अधिकाऱ्यांना कळवण.
मी रोज पेपर वाचतो त्यात अमुक ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला हे समजत. शेजारच्या कॉलनीत दिवसाढवळ्या चोरी झाली हे समजत. पोलिस काय करत होते? फुटेज चेक केलं का? सापडले का चोर? चार दिवसांच्या चर्चे (बाजारगप्पा) नंतर आपण विषय सोडून देतो. पण आपण तोपर्यंत निष्क्रिय असतो जोपर्यंत तशीच घटना आपल्यासोबत घडत नाही.
समर्थांनी सांगितलच आहे "पहिले ते सावधपण"
मी ह्यात काय करू शकतो? सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवणं. सुरुवात आपल्या घराच्या आजुबाजूच्या परिसरात करू शकतो. चौकीदार आहे का? अंधारी मार्ग आहे का? वर्दळ आहे का? पोलिसांची फेरी होते का? सीसीटीव्ही आहे का? अशा गोष्टींपासून सुरुवात करू शकता.
ह्या पुस्तकात निर्भया प्रकरण, चड्डी बनियान टोळी ह्या सारखी प्रकरण लेखकाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कशाप्रकारे हाताळली ते सांगितलं आहे पण अजून माहिती हवी असेल तर खाकी फाईल्स हे छोटेखानी पुस्तक नक्की वाचा.
खाली लिंक देतोय तिथून विकत घेऊ शकता.
धन्यवाद
केतन सावंत


1 Comments
Parents should read and discuss with their kids for creating awareness.This will enhance the precautions...rather than just worries
ReplyDeleteThanks for sharing