सफर कैलीग्राफी जगताची......................
लहानपणापासून आपल्या प्रत्येकाला शाळेत सुन्दर हस्ताक्षर काढायला सांगायचे. म्हणजे खरतर मी शाळेत होतो तेव्हा तर अक्षर कोरलेल्या पाट्या होत्या त्यामुळे त्यावर सारख सारख गिरवून गिरवून अक्षर आपोआप वळणदार यायच. आताच्या शाळांमधून शिक्षणच डिजिटल झाल तर ह्या मुलाना कुठे त्या कोरलेल्या पाट्या मिळणार. त्यात त्यांची काहीच चूक नाही किंवा कुणाचीच नाही कारण आपल्याला काळासोबत चालवच लागत. असो. ……
तर मूळ मुद्दा बाजूलाच करून चालणार नाही. लहानपणी जे शिक्षक आणि घरातले अक्षर वळणदार काढ अस का ओरडायचे ते आता कळत कारण लहानपणी शिक्षकांचा आणि घरच्यांचा ओरडा खाऊन मार खाऊन जे अक्षर सुधरलय त्याचाच आज प्रोफेशन म्हणून उपयोग होतोय. खरच वंदन आहे त्या सगळ्याना. तर अशी ही कैलीग्राफी आज प्रत्येकाला आवडते, तिच्यातल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतींमुळे, वेगळ्या स्ट्रोक्स मुळे किंवा अजुनकाही पण ही कैलीग्राफी म्हणजे नक्की काय? असा प्रश्न पडू शकतो? तर मी माझ्या ब्लॉग तर्फे मी जमेल तशी कैलीग्राफी आणि त्या बद्दलची माहिती जीतकी देण शक्य होईल तितकी नक्कीच देईन आता पुरत फ़क्त आपण कैलीग्राफीच्या वेगवेगळे प्रकारांची नाव पाहुया आणि ती कशी केली जाते ते ही पुढील सत्रात पाहूया
मुख्यत्वे करून हातानेच कालीग्राफी केली जाते पण त्यातही कागदावर,भिंतीवर,कपड्यांवर, छत्रीवर अशा बऱ्याच गोष्टीवर कैलीग्राफी केलि जाते पण जस आपण काळाबरोबर बदलतो तसाच आजकाल डिजिटल कैलीग्राफी सुद्धा करता येते.
ही श्री. अच्युत पालव ह्यानी केलेली कैलीग्राफी (हाताने )
आणि ही डिजिटल कैलीग्राफी। म्हणजेच ही कैलीग्राफी करताना कागद किंवा ब्रश अशा तत्सम् वस्तूंचा वापर न करता डायरेक्ट कंप्यूटर वर केली जाते. त्या साठी एक वेगळ पेन टेबलेट नावाच उपकरण येत ह्याच्या सहाय्याने आपण डिजिटल कैलीग्राफी करु शकतो.
चला तर मग कैलीग्राफी जगताच्या ह्या प्रवासला सुरुवात झालेलीच आहे तर एकदा त्या सद्गुरुच स्मरण करून आपण पुढे जाऊ।
हरी ॐ। श्रीराम। अंबद्न्य
- केतनसिंह सावंत


0 Comments