जी भरके खेलो


                                           दि.  ६ में २०१० रोजी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुनी  "रामराज्य' ह्या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण अस  प्रवचन केल.  त्यात त्यांच्या आणि आपल्या  सगळ्यांच्या आवडीची गोष्ट  जाहिर केली  ती  म्हणजे "अनिरुद्धाज इंस्टिट्यूट ऑफ़ स्पोर्ट्स एण्ड  बोन्साय  स्पोर्ट्स" ची स्थापना आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे स्वतः बापू ह्या इंस्टिट्यूटचे  डीन आहेत.
                       ह्या इंस्टिट्यूट मधले प्रत्येक निर्णय हे बापूंच्या सुचनेवरूनच घेतले जातात, म्हणजे अगदी नवीन  एखादा खेळ  आपण  शोधला तरी  तो बापूना कळवून त्याच्या सुचनेवरूनच तो खेळ  पुढे प्रत्येक ठिकाणी खेळवला  जातो. आज आपण मुंबईतल्या बर्याचशा पुरुषार्थ मंडलम  कलशांतर्गत  स्पोर्ट्स सुरु केले आहेत. आज तिकडे खेळायला जाणाऱ्या आपल्या श्रद्धावान सिंह आणि वीराना विचारु  शकता.
                आज आपल्यापैकी प्रत्येक जण  डिप्रेशन, टेंशन च्या खाली वावरत  असतो याला कारणही तशीच असतात; तसेच प्रत्येक जण  ह्यासगळ्यातून बाहेर पडून  निर्भेळ आनंद शोधत असतो पण तो मिळत  नाही कारण ती योग्य वाट दाखवणारा "वाटाडया" आपल्याला मिळालेला नसतो पण आपल तस  नाहीय, आपल्या बापुनी  यावर सगळ्यात सुंदर, सहज आणि अत्यंत सोपा असा मार्ग दिला तो म्हणजे "भरपूर खेळा " "जी भरके खेलो". आणि खरच आपण आज अनुभवतोय की आपल्यात काय फरक  पडला खेळल्यामुळे आणि अजूनही आपण  सक्षम होतोय आणि हे सगळ  होतय ते आपल्या बापूंमुळेच. आपल्याला काही करायच नाहीय फक्त खेळायच ते सुद्धा आठवड्यातून १ दिवस २ तास  आणि ह्याची फलश्रुति काय तर सगळ्या प्रकारच्या डिप्रेशन,टेंशन आणि आजारापासून मुक्तता आणि सुदृढ़ शरीर, आणि फ़क्त आनंद...
                   बापू स्वतः उत्तम बैडमिंटन, क्रिकेट खेळतात ह्याचे यू ट्यूब वर वीडियोस आहेत जे आपण  बघु शकतो मग आपन विचार करायला हवा की आपला बापू ज्र खेळतो अजूनही तर आपणही खेळायला हव कारण हयात कुठेही वयाच बंधन नाही  ज्याला खेळायची इच्छा आहे त्या प्रत्येकाला खेळायच आहे ही आपल्या लाडक्या बापूंची आपल्या डैड ची इच्छा आहे जी आपन पूर्ण करायचा पुरेपूर प्रयत्न करुया कारण आपल ध्येय एकच असल पाहिजे "आपल्या बापूचा आनंद" हे एकच मनात ठेऊन आपल्याला सुरुवात करायची आहे बाकी सगळ सांभाळायला बापू समर्थ आहेच.

                                                    । । हरी ॐ। । श्रीराम। । अम्बद्न्य। ।   
  

Post a Comment

0 Comments