हरी ॐ
मध्यंतरी एक चित्रपट आला होता "विटी दांडू" नावाचा, मी तो पाहिला आणि माझ्या ओळखीच्या व्यक्तिना मी तो आवर्जून पाहण्यास सांगितला. खरच तो चित्रपटच तसा होता . स्वातंत्र्यपूर्व काळात घडणाऱ्या गोष्टीमध्ये ह्या खेळाला अतिशय चपखलपणे दिग्दर्शकाने बसवल होत. संपूर्ण चित्रपटात कुठेही विसंगति नाही दिसून येत; खरच आपण सगळ्यानी आवर्जून हां चित्रपट पहा.
माझ्यासाठी तर खेळ आणि अनिरुद्धाज इंस्टीट्यूट ऑफ़ स्पोर्ट्स एण्ड बोन्साई स्पोर्ट्स हे एकच आहेत. अस काय दिल ह्या खेळाने, ह्या इंस्टीट्यूट ने मला? आज जेव्हा इंस्टीट्यूट सुरु होऊन दोन अडीच वर्ष झाली आणि बापुनी "श्रीमद्पुरुषार्थग्रंथराजात" शिकवल्याप्रमाणे जेव्हा "सिंहावलोकन" करतो तेव्हा जाणवत की माझ आयुष्य किती बदललय आणि ह्या सगळ्याच कारण फक्त ही इंस्टीट्यूट आणि ह्या इंस्टीट्यूट चे सर्वेसर्वा डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी, बापूनी रामराज्याच्या प्रवचनावेळी ह्या बद्द्ल माहिती देताना सांगितलं की ते गेले १० वर्ष ह्यावर संशोधन करत आहेत म्हणजेच "खेळ " हा विषय किती खोल असला पाहिजे ह्याची आपण कल्पना करू शकतो आणि आपल्याला काय करायच आहे तर फक्त खेळायचय, कारण आपली सोय आपल्या लाडक्या मित्राने करून ठेवलेली आहे, फ़क्त आपली इच्छा हवी; बापूनी आपल्याला सुरुवातीलाच सांगितले आहे "तू आणि मी मिळून शक्य नाही अस ह्या जगात काहीच नाही".
मग जेव्हा आपल्याला कळत की स्पोर्ट्स अमुक ठिकाणी चालु आहेत आहेत तेव्हा आपण स्वतालाच कारण देऊ लागतो, ह्या वयात कुठे? आता कुठे? आमचा सुट्टीचा हक्काचा एकच दिवस असतो, एकच दिवस उशिरा उठायला मिळत अशी एक ना अनेक कारण देत असतो आणि आपण आपल्याच विकासाच्या आड़ येत असतो पण अशा वेळेस आपण बापूंच वरील वाक्य विसरून नाही आणि एकदा का हे वाक्य मनात ठसल की आपसूकच आपण स्वताला कारण देण बंद करू. आपल्याला हवीय ती फक्त इच्छा: इच्छा खेळायचि… इच्छा स्वतः ला निरोगी बनवण्याचि.... आणि इच्छा सद्गुरु आद्न्यापालनाचि………
मागच्या भागात सांगितलेली इन्वेस्टमेंट केली की साहजिकच डैड ला आनंद होणार आहे.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि ह्या बोन्साई स्पोर्ट्स ची एक छोटीशी झलक पहा
https://vine.co/u/1015287744030830592
हरी ॐ।।श्रीराम।।अंबद्न्य
- केतनसिंह सावंत

0 Comments