पाऊस तुझा माझ्या मनातला

पाऊस तुझा माझ्या मनातला


तुझ्या आठवणीत झुरुन आता
वर्ष खुप झाली
पाऊस...सोबत तू म्हणजे
ठरलेल समीकरण झाली
तू अधिक पाऊस म्हणजे मी घायाळ
अस आजकाल जो तो बोलू लागतो
म्हणून वाटत
मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो

भिजलेल्या अंगणामध्ये
तुझा गंध येतो
दारासमोरच्या तुळशीमध्ये
तुझा पदर अडकतो
असा कसा तो पाऊस
जो तुला इतका भिजवतो
की तुला बघुन मी मात्र पाणी पाणी होतो
म्हणून वाटत मी पुनः पुन्हा...

खिड़क्या दार सारी कशी थंडगार होतात
तुझ्या तळहातावर इवले इवले थेंब खेळू लागतात
भिजलेल्या केसांवरून ओघळणार पाणी
मला अजुनच हर्ट करून जात
कळत नाही का पण
तुझ्याभोवती मन पुन्हा झरू लागत
कसा बसा सावरतो स्वताला पण
तू अलगद भिजवून जातेस
माझ्याही नकळत स्वताला माझ आयुष्य बनवतेस
तू माझी धरणी वगैरे कल्पना
मला देता येत नाही
पण तुझ्यावर प्रेम केल्याशिवाय राहवत नाही
बस...एवढच आता लिहितो
म्हणून वाटत
मी पुन्हा पुन्हा....

- केतन सावंत

Post a Comment

0 Comments