खर सांगायच तर कविता करायची आवड मला शाळेत असल्यापासून लागली. ८ वी मध्ये असताना पहिली कविता केली होती; त्याच झाल अस की ऑफ़ पीरियड होता आणि बाहेर पाऊस पडत होता वर्गावर आलेल्या दुसऱ्या शिक्षकांनी वर्गाबाहेर जायला मनाई केली होती आणि सगळ्यांना सांगितल की ह्या पावसावर तुम्हाला ज्या काही ओळी सुचत असतील त्या लिहा.. हव तर फ़क्त ४ ओळी लिहा पण लिहा आणि तेव्हापासून माझी कविता लिहायची सुरुवात झाली त्या पहिल्या कवितेच्या ओळी साधारण अश्या होत्या...
" नदी नाले भरतात तुडुंब, तू करतोस सर्वाना ओलाचिंब"
आता हे वाचल तरी हसायला येत. पण मी कवितांच्या प्रेमात पडलो तो म्हणजे श्री. संदीप खरे यांच्या कविता ऐकून आणि वाचून
![]() |
| श्री. संदीप खरे |
संदीप यांची मला सगळ्यात आवडलेली कविता म्हणजे "नसतेस घरी तू जेव्हा..." , आजही हे गाण मी कुठेही, कधीही, कितीही वेळा ऐकू शकतो; पण हे गाण मला एका वेगळ्या प्रकारे ऐकायला आवडत ते म्हणजे.. शांतपणे एकांतात झोपाळ्यात बसून.. डोळे मिटुन, गुड़ुप अंधारात.... आजही हे गाण ऐकायल्यावर हृदयात खोलवर कुठेतरी काहीतरी हलत आणि तीच जाणीव मला प्रत्येक वेळेस हे गाण ऐकताना होते , तेच सलिल कुलकर्णींच्या बाबतीत त्यांचा आवाजही तसाच काळीज चिरत जाणारा... म्हणजे अगदी नसतेस घरी तू जेव्हा पासून ते दमलेल्या बाबाची कहाणी पर्यन्त सगळीच गाणी वेगळी आहेत, ह्या कार्यक्रमाशी जोडलेल्या अनेक जणांच्या अनेक आठवणी आहेत माझ्यासारख्याच जे ह्या "आयुष्यावर बोलू काही" च्या परिवाराशी जोडले गेले आहेत...प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावासा हा कार्यक्रम..जरूर पहा..
- केतन सावंत


0 Comments