विशेष, विलक्षण, विक्षिप्त - दै. प्रत्यक्ष




                                                     
                     
                     बरोबर १० वर्षापुर्वी दत्तजयंतीच्या सुमुहूर्तावर डॉ. अनिरुद्ध जोशी यानी दै. प्रत्यक्ष सुरु केला. आज ह्या वर्षीच्या २०१५ च्या दत्तजयंतीला १० वर्ष पूर्ण झाली. दै. प्रत्यक्ष ची वैशिष्ट्ये  म्हणजे प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तींसाठी हां उपयुक्त आहे; तसेच जगाचा अभ्यास आणि रोजच्या जागतिक व राष्ट्रिय  पातळीवरच्या महत्त्वाच्या घटना यात समाविष्ट असतात, लहान मुलांसाठी फरक  ओळखा, चित्र रंगवा, शास्त्रद्यांची माहिती, शेअर  बाजाराबद्द्ल माहिती; सोप्याभाषेत  सांगायच झाल तर रोजच्या आणि घडून गेलेल्या घटनांचा लेखाजोखा आपल्याला प्रत्यक्ष देतो.
                   
                   अगदी २००६ साली "तिसऱ्या महायुद्धा" बद्द्ल आलेली लेखमालापुढे पुस्तक रूपाने प्रकाशित झाली आणि आजच्या घडीला ते पुस्तक "amezon Third World War on Amazon  साइट वर  "बेस्ट सेलर" च्या यादीत आहे.
           
                          प्रत्येक वर्षी येणारा 'वर्धापनदिन विशेषांक' आणि 'नविन वर्षाचा विशेषांक' हा खुप अनमोल ठेवा आहे जो प्रत्येकाने जतन करायलाच हवा. अगदी मागच्या वर्षी सोशल मिडिया बद्द्ल दिलेली माहिती म्हणजे अगदी ब्लॉग बनवायचा कसा? किंवा त्या आधी आलेले विशेषांक ज्यात डॉ. अनिरुद्ध जोशी ह्या एकाच व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडले गेले म्हणजे स्पष्टच सांगायला गेले तर डॉ. कुणासाठी मित्र म्हणून, कुणाचे साहेब म्हणून तर कधी कुणाचे मार्गदर्शक म्हणून कसे  आहेत याची माहिती कळते.



आणि  ज्याना हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये वाचायचे असेल त्यांनी पूज्य समीरदांदांच्या ब्लॉग वार जाऊन वाचू शकता www.aniruddhafriend-samirsinh.com

      खरच हां प्रत्यक्ष फक्त पेपर नसून तो आपला खराखुरा मित्र आहे जो आपल्यासोबत चालतो, बदलत्या काळासोबत आपल्यालाही अपडेट ठेवतोय. या वर्षीच्या दत्तजयंती  विशेषांका बदल सांगायच म्हटल तर नावाप्रमाणेच "विशेष, विलक्षण, आणि विक्षिप्त", हयात आलेल्या घटना वाचल्या  की कळत आपल्याला "किती" माहिती आहे   त्यातले काही लक्षवेधी लेख जे मला आवडले ते म्हणजे १. गोल्ड़न ट्रेनच भुयार, २.ओकिगहारा सुसाईड फारेस्ट, ३. खरखुर ज्यूरासिक पार्क, ४. वाळवंटातले मत्स्यालय आणि ५. आय लव्ह यु माय डैड.
                   यावर्षीच्या विशेषांकात काही महत्त्वाच्या  आणि भयावह गोष्टींचा  समावेश करून  घेण्यात आला आहे म्हणजे मानवी अवयवांची तस्करी, शुद्ध श्वास हवा इ. पण ह्यांचा समावेश आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर आपल्या मनातून ह्या गोष्टींची भीती  निघून जाण्यासाठी. अगदी पहिल्यापासूनच आपल्या प्रत्येक विशेषांकात त्याच्या प्रत्येक वाचकांना "वेगळ" देत  आला आहे आणि हीच प्रत्यक्ष ची खासियत आहे जी ह्याला इतर वर्तमान पत्रांपासून वेगळ ठरवते आणि ही ओळख प्रत्यक्ष ने आजतागायत जपलेली आहे, प्रत्येकाने दै. प्रत्यक्षचे विशेषांक आपल्या संग्रही  ठेवण्यासारखेच आहेत.

- केतन सावंत 

Post a Comment

0 Comments