प्रवास - माझ्या उलगडण्याचा


                                        माणसाला ना  खूप  काही सांगायच असत.. ह्याला..त्याला... आणि स्वताला.. कधी आठवणी असतात, कधी  भांडण, कधी  उणी दूणी किंवा अजुन काही पण जेव्हा मी स्वताशी संवाद साधतो तेव्हा मनाच्या तड़े  गेलेल्या जमिनीवर हलका हलका पाऊस शिंपडला जातो;
                               रोजच्या वैताग आणणाऱ्या कामामुळे आयुष्य हे "रोजचच" होउन जात; मधे whats app  वर एक विनोद वाचला होता "आयुष्य हे कंडक्टर सारख झालय , रोज घरातून निघतो पण जायच कुठे ते माहिती नाहीय"; वाचून हसायला आल पण  कुठेना  कुठे तरी आपल आयुष्य आणि हा विनोद हयात कुठेतरी साम्य असल्याच जाणवल;




                             पण जेव्हा जेव्हा मी  असा अस्वस्थ झालो तेव्हा माझ्या सोबतीला आली ती "पुस्तक", मग भले ती कवितांची असो,ऐतिहासिक असो, ललित असो किंवा अजून काही पण मला ह्या अस्वस्थतेच्या वाटेतुन वेगळ केल ते ह्या पुस्तकांनीच, तसा काही माझ्याकडे अगदीच फार पुस्तकांचा संग्रह वगैरे नाही पण जी काही थोडिफार पुस्तक आहेत ती मी पुनः पुन्हा  वाचत असतो, तीच तीच कविता, तीच तीच कथा वाचून मला  कंटाळा नाही येत. कदाचित हीच खासियत आहे ह्या पुस्तकांची; मला जास्त गुंतवून ठेवतात ती शिवाजी महाराजांवरील पुस्तक, आपला इतिहास आणि तोहि महराजांचा...
                                         
                                            निश्चयाचा महामेरु।  बहुत जणांसी  आधारु।
                                              अखंड स्थितीचा निर्धारु।  श्रीमंत योगी।।

आजही कुठलीही कथा आठवली की अंगावर काटा येतो आणि वाटत आपण खरोखरच भाग्यवान आहोत की असा "राजा" आपल्याला लाभला..

                                     तेच कवितांच्या बाबतीत, मला गुंगवून ठेवणाऱ्या काही ख़ास कविता म्हणजे नसतेस घरी तू जेव्हा, दमलेल्या बाबाची कहाणी , दूर देशी गेला बाबा आणि अजुन बऱ्याच; पण एक गोष्ट मात्र नक्की की ह्या कविता आणि कथा वाचून मला सुचत जातो,कागद भरला जातो आणि मन मात्र शांत होत. अगदी रितहोत. काय कस माहिती नाही पण मी पूर्ण मोकळा होतो


                            "बघ तुझ्या रित्या नभी, आज चांदण भरून आल, 
               चंद्र झाला मूका; पण अंगण  बोलून गेल"
                                                                                      - केतन सावंत 
 हे आणि असच बरच काही सुचत जात आणि मी स्वताला उलगडत जातो अगदी हळूवार.. माझ्या कविते सारखाच म्हणजे फ़िल्मी स्टाइल मध्ये सांगायच झाल तर "मुंबई पुणे मुंबई - २" मध्ये स्वप्निल जोशी जस म्हणतो की नात्यांची मजा ही हळूवार  उलगडण्यात आहे तसच..... प्रयत्न करून बघा, नक्कीच काहीतरी वेगळ गवसेल. 


 - केतन सावंत
                

Post a Comment

0 Comments