शेवटचा दिवस... वर्षातला..
भासासारखे सरले वर्ष म्हणून म्हटले बरे झाले
नुसतेच धावताना मृगजळापाठी अवघे आयुष्य सरले
- केतन सावंत
हे वर्ष कधी गेल, कस सरल.. काही कळत नाहीय.. थोड़ रिवाइंड करता आल आयुष्य तर? आयुष्याला सुद्धा जर ctrl +z च बटन असत तर? ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची प्रश्नावली आज डोळ्यासमोर उभी आहे... सरत्या वर्षाबरोबर आयुष्य वाढत जात पण माझी बुद्धिमत्ता किती वाढली.. ह्या समाजात चालणाऱ्या कितीतरी प्रश्नांवर मी एक माणूस म्हणून किती उपयोगी आलो? मी माझ्यापरिने काही मदत केली का? ऎसे प्रश्न भंडावून सोडतात.
बघा ना म्हणजे इथे इंडियन क्रिकेट टीम जिंकली म्हणून आपण जल्लोष करत होतो आणि त्याच वेळेस आपल्या काही "शेतकरी बांधवानी"आत्महत्या केली..आणि त्यावर मी काय केल? अगदी सहज पेपरच पान उलटाव तस "ignore" केल. परवाच बातमी वाचली फ़क्त मराठवाड्यात अवघ्या एक महिन्यात ११२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली... कारण गरीबी, दुष्काळ.. की आपण? आज असे कित्येक प्रश्न रोज उभे राहतात आणि संध्याकाळ च्या विरार लोकलमध्ये माणस शिरावी तशी जबाबदाऱ्यांमध्ये हरवून जातात... अवघ आयुष्य सरेल समाजाच्या उठाठेवी करत बसलो तर अस म्हणणाऱ्याना माझा कोपरा पासून नमस्कार... अरे लहानपणापासून प्रतिद्न्या म्हणताय ना "भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत" मग ह्या शेतकऱ्यांच्या बाबतीतच हा दूजा भाव का?
तसच अगदी कालचीच बातमी एका गर्भवती महिलेवर अत्याचार... अरे लाजा कशा वाटत
नाहीत ह्या लोकांना? तुमच्या घरात पण आई बहिणी आहेतच ना?त्यांच्याबद्द्ल कधी असा वाइट विचार का नाही आला मनात? तुमच्या मुली त्या मुली आणि दुसऱ्यांच्या मुली काय खेळण वाटल का? स्त्रीच रक्षण ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे ह्याची जाणीव आपल्याला असायला हवी.
नाही मी काही मोठा लेखक किंवा मोठा philisopher नाही पण ह्या भारताचा एक सामान्य पण सुजाण नागरिक आहे आणि म्हणूनच मी माझ्यापरिने जीतकी होईल तितकी मदत ह्या समाजाच्या कार्यात देणार आहे आणि ती सुद्धा कशी तर ह्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी गांडूळ खताची निर्मिति करून , गुरांसाठी चारा, लहान मुलांसाठी कपडे शिवून (चरख्यावर सूत कातून) आणि ह्या कार्यात मला मदत होते ती "सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन"ह्या संस्थेची.
सध्या फ़क्त मी ह्या समाजाच्या प्रश्नांमध्ये मुख्य प्रवाहात असलेल्या दोन ठळक मुद्यांवर माझ मत मांडल , पुढेही बोलेनच; आणि जे झाल ते झाल ज्या वाईट गोष्टी घडून गेल्या त्या सोडून देऊन नविन गोष्टी आत्मसात करुया.. पुन्हा एकदा आयुष्याच्या पाटीवर "अ ब क ड" काढूया.. बाकी सर्व सांभाळायला परमेश्वर समर्थ आहेच!!!

कारण शेतकरी जगला तर देश जगेल आणि स्त्री चा योग्य तो आदर राखला गेलाच पाहिजे कारण जर आज स्त्री नसेल तर सगळी नाती व्यर्थ आहेत कारण सर्व नाती तिच्यापासूनच सुरु होतात आणि तिच्यापाशीच येऊन थांबतात

0 Comments