पाडगावकर






विस्तवातल्या निखाऱ्यापरि
चंद्र  जेव्हा जाळू  लागतो
तेव्हा समजायच कुठे ना कुठे
कोणीतरी
तुमच्यासाठी झुरत असत....
पाडगावकरांच्या कवितेतल प्रेम
तेव्हा आठवायच असत...

असच जगायच असत...
असच झुरायच असत....
माझ्यासाठी..
तिच्यासाठी...
एकमेकांसाठी...
एकमेकांसोबत कवितांमध्ये
भिजायच असत...
अन "पाडगांवकरानी" शिकवलेल "प्रेम"
ओल्या ओंजळीत हळूवारपणे जपायच असत..

- केतन सावंत 

Post a Comment

0 Comments