नटसम्राट
काय लिहू , किती लिहू आणि कोणाबद्द्ल लिहू, सगळच एवढ भयानक सुंदर होत... काल रात्री नटसम्राट पाहिला.... शिरवाडकरांची एक "अजरामर" कलाकृती...धन्य ती आपुली रंगभूमी आणि धन्य ती मायभूमी जिला तुमच्यासारखा पुत्र लाभला..
काय लिहू , किती लिहू आणि कोणाबद्द्ल लिहू, सगळच एवढ भयानक सुंदर होत... काल रात्री नटसम्राट पाहिला.... शिरवाडकरांची एक "अजरामर" कलाकृती...धन्य ती आपुली रंगभूमी आणि धन्य ती मायभूमी जिला तुमच्यासारखा पुत्र लाभला..
प्रत्येक नट हीच इच्छा बाळगून असतो की त्याला एकदातरी "नटसम्राट"साकारायला मिळायला हवा... 70mm ची स्क्रीन, किरण यद्य्नोपवीत यांचे अफ़लातून संवाद, महेश मांजरेकरांच अतिशय सुंदर दिग्दर्शन आणि नाना पाटेकरांचा अफाट अभिनय.. तसेच मृण्मयी देशपांडे, अजित परब, नेहा पेंडसे आणि सुनील बर्वे या सर्वांची काम देखील वाखाणण्याजोगी आहेत तसेच गुरु ठाकुर आणि कुसुमाग्रज यांची गाणी लक्षात राहतात, सरकारांची भूमिका निभावणाऱ्या मेधा मांजरेकर या देखील शेवटपर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात राहतात.. प्रेक्षकांना शेवट पर्यन्त खिळवुन ठेवण्यात नटसम्राट ची संपूर्ण टीम १००% यशस्वी झालेली आहे
नानांचा काळीज चिरत जाणारा आवाज ही चित्रपटाची उत्तम बाजू आहे... एका तूफानला कोणी घर देता का घर..? किंवा माझ्याजागी ठामपणे उभा आहे तो मी आहे.. मी आहे ceaser , मी आहे othello आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर "नटसम्राट"....ही वाक्य अजूनही कानात घुमतायत........
शब्द थिटे पडतील अशी काही माणस असतात त्यापैकीच एक बहुधा "नाना पाटेकर" असावेत तसेच हॉस्पिटल मधल्या प्रसंगात विक्रम गोखले आणि नाना पाटेकर या दोन मातब्बर कलाकारांची जुगलबंदी पाहायला मिळाली हां दुग्धशर्करा योग मांजरेकरानी जुळवून आणला त्याबद्द्ल त्यांचे शतश: आभार !!!
फुटपाथवरची म्हातारी रुकसाना, सिद्धार्थ, विठोबा यांच्या भूमिका छोट्या असल्यातरी आपल्या भूमिकाना त्यांनी योग्य प्रकार न्याय दिलेला आहे..... भूमिकेच्या नावाला साजेसच काम केलेल आहे नानानी, एवढी सगळी पात्र एकाच व्यक्तिरेखेत दाखवण्याच शिवधनुष्य त्यांनी अगदी लीलया पेलल आहे
"या जगताच्या रंगमंचावर येणारी ही पात्र तुम्ही... आम्ही... आपण सर्वच जण त्या एक विधात्याच्या नाटक कंपनीत काम करत असतो, तोच आपला दिग्दर्शक असतो आणि तोच पडदा सरकवणारा मुलगादेखील आणि मग जर एखादा प्रयोग फसला तर अनंतबाहु पसरून आणि सर्वांच्या विकासासाठी झटणाऱ्या हे परमेश्वरा; आमच्या प्रयोगांच्या वेळेसच तुझी योगनिद्रा कशी बरी लागते? ह्या अजुन पर्यन्त न उलगडलेल्या कोड्याच उत्तर सुद्धा तूच दे रे बाबा " - केतन सावंत
सहज सुचल म्हणून लिहिलय, काही व्यक्तिरेखा माझ्या डोक्यात घर करून आणि नानानी नव्हे नटसम्राटानी ते केलय;
- केतन सावंत


4 Comments
नटसम्राट एक अद्वितीय , अजोड , अविस्मरणीय , अजरामर कलाकृती ! केतन खूप सुंदर शब्दांत मांडले आहे आपले मनोगत !
ReplyDeleteHari Om..shreeram...ambadnya
Deleteआपल्या भावना आपण सुंदर पणे मांडल्या आहेत
ReplyDeleteHari Om..shreeram..ambadnya
Delete