व्हॅलेंटाईन
तुझ माझ करता करता
नेहमी आपल भांडण होत
मग तुझ गाल फुगवून बसण
आणि तुझ्या बटांशी माझ खेळण चालू असत
तुझ्यासाठी रुसण म्हणजे प्रेम असत
माझ्यासाठी तुझ हसण म्हणजे प्रेम असत
तुझ हसण, तुझ लाजण
सार सार काही तुझ असत
पण सगळ मात्र माझ्यासाठीच असत
व्हॅलेंटाइनचा गुलाब, सी फेस चा राउंड
म्हणजे तुझ्यासाठी प्रेम असत
माझ्यासाठी मात्र तुझा हात माझ्या हातात असण
म्हणजे प्रेम असत
तुझी माझी मिठी
म्हणजे इतरांसाठी जळण असत
तुझी माझी जवळीक म्हणजे
घरच्यांसाठी टेंशन असत
तुझ्यासाठी सिनेमातल्या हिरोसारख तुला प्रपोज करण
म्हणजे प्रेम असत
माझ्यासाठी कोरा कागद तुझ्यावरच्या कवितानी भरण
म्हणजे प्रेम असत
कारण तुझ माझ करता करता
नेहमी आपल भांडण होत
अन प्रत्येक ऋतूंमध्ये मात्र
तुझ्यावर आभाळभर सुचत असत....
- केतन सावंत

0 Comments