सौंदर्य














तिच्याएवढ सुंदर  ह्या जगात कोणीच नाहीय
ऐकलत का?
तिच्याएवढ सुंदर  ह्या जगात कोणीच नाहीय
कारण..
वाऱ्यावर उडणारे केस, 
मोगऱ्याच्या गंधापरी विस्कटलेत 
आणि ओठावरची लाली तिच्या, मावळतीच्या आभाळापेक्षा 
जास्त जीवघेणी वाटते... 
तेव्हा वाटत... 
तिच्याएवढ सुंदर  ह्या जगात कोणीच नाहीय 

डोळ्यांमधला प्रत्येक नजरबाण  तिचा 
मला कित्येकदा असाच घायाळ करतो 
मी मात्र पुन्हा पुन्हा घायाळ होण्यासाठी 
तिच्या पापण्यांशी वाट पाहतो  
मग तिच्या कानाशी लगडणारी बट 
जेव्हा तिच्या सौंदर्यावर प्रेमाच  कोंदण लावते 
तेव्हा वाटत... 
तिच्याएवढ सुंदर  ह्या जगात कोणीच नाहीय 

अशी नटून थटून जेव्हा 
ती आरशासमोर उभी राहते 
तेव्हा अपमानान तो आरसा झुकतो आणि नभातला चंद्र 
स्वताच्या कोषात दडून बसतो 
तेव्हा वाटत तिच्याएवढ सुंदर  ह्या जगात कोणीच नाहीय

- केतन सावंत  

Post a Comment

0 Comments