बोन्साई स्पोर्ट्स

                             


गेल्या ३ आठवड्यापासून आमच्या गोरेगाव पश्चिम उपासना केंद्रावर "अनिरुद्धास इंस्टिट्यूट ऑफ़ स्पोर्ट्स एंड बोन्साई स्पोर्ट्स" ह्या अंतर्गत स्पोर्ट्स सुरु करण्यात आले. गेले एकवर्षभर आम्ही जागेच्या शोधात होतो, शेवटी बापुकृपेने जाग मिळाली. अगदी पहिल्या रविवार पासून श्रद्धवानांचा  उत्साह वाखानन्याजोगा होता. प्रत्येक जण प्रत्येक वयाचा अगदी मनापासून आनंद घेत होता...
                     सुरुवात रामोराजमणि  आणि नंतर व्यायमाने झाली
खरच फ़क्त दोन  तास  खेळल्याने पूर्ण आठवड्याभराचा उत्साह मिळतो.. सूर्यप्रकाशात खेळल्याने विटामिन डी मिळत ,संघशक्ति वाढीस लागते  आणि अनेक फायदे मिळतात तेहि "फुकट".

                            आणि आजच्या जगात  माणसाला फुकट काहीच मिळत नाही, पण  आम्हाला आमच्या सद्गुरु अनिरुद्ध बापुंमुळे  एवढ्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत आणि त्या बदल्यात बापूना  आमच्या कडून काय हवय तर काहीच नाही.... यस!!! आमचा बापू आहेच असा...... तर असा  आनंद अनुभवायला तुम्हीसुद्धा हयात सहभागी व्हा  आणि आनंद करा...
बापू म्हणतात ना

                                "अवघाची  संसार सुखाचा करीन , आनंदे भरिन  तिन्ही लोक"

- केतन सावंत 

Post a Comment

0 Comments