खेळ कुणाला आवडत नाही, अगदी सत्तरीला पोहोचलेल्या व्यक्तीला जरी विचारल खेळणार का? तर साहजिकच "हो" असच अपेक्षित उत्तर येत पण जेव्हा कृतीची वेळ येते तेव्हा मात्र नानाविध कारण देऊन ते टाळल जात... आणि मग नकार घंटा सुरु होते, ह्यातुन बाहेर येऊन जगण कमावण्यासाठी, आयुष्य कमावण्यासाठी म्हणून हे स्पोर्ट्स सुरु झाले. आता जवळपास ३ ते ४ वर्ष झाली आणि १५० च्या वर प्रशिक्षक आहेत आणि अजुन तयार होत आहेत, आज ह्या प्रत्येकाला त्यांचे ह्या इंस्टीट्यूट मधे सहभागी झाल्यापासून त्यांचे अनुभव विचारा अथवा जे दर रविवारी हयात खेळायला येणार श्रद्धावान आहेत त्यांना त्यांचे अनुभव विचारा प्रत्येकाकडन सकारात्मक उत्तरच मिळतील, हा बदल डॉ. जोशींनी घडवून आणला.......
आता परवा ऑफिस मधे बाजूच्या मित्राशी गप्पा मारत होतो, बोलता बोलता विषय निघाला तेव्हा तो त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांगू लागला, अर्थातच माझा हा मित्र ४० ते ४५ वर्षाचा आहे, खूप खुश झाला तो जुन्या आठवणी मध्ये रंगला होता; पण मी हळूच विचारल आता का नाही खेळत तर तीच नेहमीची कारण सुरु झाली, मग मी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला पण आत कुठेतरी ह्या प्रश्नाचा मी विचार करत होतो, प्रत्येकाला खेळायला आवडत पण कोण पुढाकार घेत नाही, हे वय आहे का खेळायच वगैरे सबबी दिल्या जातात थोडक्यात आपल कस झालय ना की डोळ्यांवर झापड़ लावलेल्या घोडया सारखे आपण चालत असतो म्हणजे सकाळी ९.४० ची लोकल मग दुपारी जेवण संध्याकाळी ५.५५ ची लोकल घरी आल्यावर नाश्ता, रात्री जेवण की संपला आमचा दिवस,रविवारी तर दाबून चिकन खालल की दुपारी झोपलो आणि पूर्ण दिवस आराम... नाही माझा कोणावरही आक्षेप नाही की आरोप नाही पण जस घराची पडझड व्हायला लागली की आपण आपण डागडुजी करायला लागतो पण जर वेळेवर काळजी घेतली तर पुढे काळजी करायच कारणच नाही.......
खरतर आम्ही वेगळ अस काही करत नाही, फक्त खेळतो, खेळतो आणि खेळतो.. आणि निरोगी, सुदृढ़ राहतो..
बघा हा म्हणजे पटतय का? एकदा येऊन खेळा रविवारी फ़क्त २ तास ७.३० ते ९.३० पुढे तुमच्यावर आहे....
- केतन सावंत

0 Comments