आकस्मिक भेट

                       

                                                 काल आम्ही दोघ तब्बल ५ वर्षानी मरीन ड्राइव च्या किनार्यावर बसलो होतो. म्हणजे साधारण जेव्हा आमच्या प्रेमाला सुरुवात झाली तेव्हा ती आणि मी दोघ तिकडे फिरायला गेलो होतो.. काल जाण्याच तस  काहीच ठरल  नव्हत, आमचा सगळा ग्रुप पावसाळी वातावरणात जेवायला जायच  म्हणून अगदी भिवंडी ते वसई पर्यन्तच्या ढाब्यांचा अभ्यास करून मोकळे झालो होतो पण पावसामुळे आम्हाला मुंबईतच एका हॉटेल मध्ये रात्रीच जेवण कराव लागल.. गप्पा टप्पा करत आम्ही ९ ला सुरु केलेल जेवण ११ ला संपवून जबरदस्ती निघालो.. येताना वाटत पावसाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली.. आमच्या ग्रुप मधे दोन आई बाबा आणि त्यांची तान्ही मुल  असल्यामुळे आम्हाला निमुटपणे घरी येण भाग होत , पण  नंतर थोड्याच वेळात इतर मित्र मैत्रिणींना सोडून  हीच्या दादा वहिनीने मला गाडीत बसवल आणि गाडी थेट वरळी च्या दिशेने फिरवली...
                         
                             रात्री  साधारण १२. ३० वाजले असतील आणि आम्ही पावसाचा, समुद्राचा आनंद घ्यायला म्हणून  निघालो होतो.. ऑफिस मधल्या एका सहकार्याने मला सांगितले होते पावसात सी-लिंक वरुन जायच.... एक वेगळाच अनुभव मिळतो... भन्नाट वारा.. आणि मनसोक्त बरसणारा  पाऊस... खरतर आम्ही तिकडे पोहोचलो तेव्हा तिकडे पाऊस नव्हता म्हणून आम्ही त्या कट्ट्यावर बसलो होतो.. वेळ होती रात्री १. ३० वाजता... आमच्या सारखेच कितीतरी जोडपी आपापसात गुंतले होते, पण  आम्हाला त्याच्याशी काही घेण देण नव्हत , माझ्यासाठी त्या वेळे साठी  माझ विश्व म्हणजे "ती , पाऊस  आणि समुद्र" एवढच. त्यावेळेस जणू बाहेरच जग माझ्यासाठी बधिर झाल होत, अगदी शांत, काहीच नाही... कसले प्रश्न, कसले त्रास..काही काही नाही... आणि दोघांनाही आम्हाला तो पहिला दिवस जसाच्या तसा आठवला, कुठे फिरलो, काय खाल्ल? सगळ  आठवल , तिचे दादा वहिनी गप्पा मारण्यात दंग होते आणि आम्ही आमच्या भविष्याची चित्र रंगवण्यात मग्न होतो... एक एक आठवणींना उजाळा  देट होतो... तसे आम्ही भेटत असतो पण  कालची भेट वेगळी होती.. बहुधा मी मनाने "तिच्या"अजून जवळ आलो होतो आणि तिहि... खूप वर्षानी  बहुधा पहिल्या दिवसानंतर बहुतेक कालच आम्ही इतकि शांतता अनुभवली होती , मनातल्या मनात मी तिच्या दादा वहींनिचे मनापासून आभार  मानत होतो.. काल मला सगळच वेगळ जाणवत होत..... ती, पाऊस आणि समुद्र, जितकी चर्चा आम्ही ह्या इतक्या वर्षात बाकीच्या आणि आमच्या गोष्टींवर केली  त्या पेक्षा कितीतरी जास्त काल फ़क्त एकमेकांचा हात हातात धरून, अबोलपणेच डोळ्यांनी बोललो, काल तिकडे काही सुचल वगैरे काहीच नाही, मी फक्त अनुभवत होतो तिच्या आणि माझ्या प्रेमाला आणि आभार मानत होतो त्या परमेश्वराचे "हिला" माझ्या आयुष्यात पाठवल्या बद्द्ल.....

क्रमश:

केतन सावंत 

Post a Comment

0 Comments