विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी

                  परवाचीच गोष्ट पाऊस पडायला लागला तस सहजच दरवाजातून पाहत होतो, फ़क्त माझ्या घरासमोर  नाही तर आजूबाजूचा पूर्ण परिसर...त्यात ना कोणी लहान मूल दिसली ना डबक्यात कागदाच्या होड्या.... आणि मग आपसूकच  जाणीव झाली की आपल बालपण किती सुन्दर होत आणि ह्या मुलांच्या नशिबी ते नाही की;त्याना ते कळत असून वळत  नाही. 

आपल म्हणजे अस झालय ना की आम्हाला निरोगी आयुष्य हव, पण त्यासाठी प्रयास नको; लहानपण देगा देवा हे वाचतो पण ते वाचन फ़क्त त्या पुस्तक पुरतच मर्यादित राहत ते कृतीत उतरत नाही.. आणि हे सगळ बघून ह्यावर अभ्यास करून एक व्यक्ति आहे की जीने आम्हाला ह्या तुकोबांच्या अभंगाच्याओळी पुन्हा जगायला शिकवल.


डॉ. अनिरुद्ध जोशी. आता ही एकच व्यक्ति अशी आहे की जी वयाची ५० शी ओलांडली तरी बैडमिंटन,क्रिकेट इत्यादि खेळ स्वतः खेळते ....स्वतः अभ्यास करून  "अनिरुद्धाज इंस्टीट्यूट ऑफ़ स्पोर्ट्स एंड बोन्साय स्पोर्ट्स" नावाची इंस्टीट्यूट उभी केली आणि आज जवळपास १००च्या वर हयात प्रशिक्षक आहेत जे सम्पूर्ण मुंबई, मुंबई उपनगर तसेच ठाणे, बोइसर इत्यादि ठिकाणी खेळ शिकवतात.. असे खेळ जे तुम्ही तुमच्या लहानपणी खेळला होतात आणि इतरही अनेक गोष्टी आहेत...





 आपल्या भारतात आज एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ती म्हणजे आजच्या समाजात एकाला दुसऱ्याची प्रगती बघवत नाही ह्याच मुख्य कारण म्हणजे कारण आपण संघभावना विसरलो आणि बापूनी हीच संघ भावना आमच्यात वाढीस लावली आधी सांघिक उपासनेतुन आणि आता सांघिक खेळातुन....बापूनी आम्हाला माणूस जोडायला शिकवला त्यांच्या कृतीतून; कार्यातून... तर ह्याच संघभावनेच  उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही इंस्टीट्यूट.... ज्यात लहानमुलांपासून अगदी सत्तरिला पोहोचलेल्या आजीबाई (वीरा) जेव्हा पूर्ण कंबरेत वाकून लगोरी फोडतात तेव्हाचा त्यांचा आवेश आणि ते बालभाव पाहुन जाणीव होते की आयुष्यात खेळ किती महत्त्वाचा आहे, आणि बापुनमुळे आपण त्याचा भाग आहोत त्याचा सार्थ अभिमान आहे.. आपण अभंग ऐकतो ना "विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी"तर ह्या विठोबाच्या राज्याची ही "अनिरुद्धाज इंस्टीट्यूट ऑफ़ स्पोर्ट्स एंड बोन्साय स्पोर्ट्स" ही एक महत्त्वाची पायरी आहे जी चढण नचढण हे प्रत्येकावर अवलंबून आहे परंतु ह्यापायरीमुळे आपल्या आयुष्यात खुप सकारात्मक आणि चांगले बदल होतील एवढ मात्र १० ८ % खर... मग आयुष्य खरच विठोबाच आणि दिवाळी नित्याची होईल 

- केतनसिंह सावंत 


Post a Comment

0 Comments