देव म्हणाला तरी

देव म्हणाला तरी 
मी सुद्धा कट्टर नास्तिक आहे 
तुझ्याशिवाय माझ्याशी भांडायला 
कुणापाशी वेळ आहे... 
 बघ म्हणजे... 
पूर आला, भूकंप आला 
तेव्हा फक्त माझ्याकडे तुमच्या नजरा फिरतात 
संकष्टी असो नाही तर दूसर काही 
घरचे  नैवेद्य फक्त शास्त्र म्हणून समोर ठेवतात 
तू तर तेवढसुद्धा नाही करत 
हे  एक मला तुझ पटत 
दिखाऊपणा नाही 
म्हणूनच मला तुझ नास्तिकपण भावत 
मी सुद्धा एकटा बसून कंटाळतो रे 
कधी सहज म्हणून तरी माझ्याशी गप्पा मार
नकोय तुझी barter सिस्टम 
अन नकोय ते तुम्ही केलेल सोन्या चांदीच दान  
बघ म्हणजे 
तुझ्या busy schedule मधून 
थोड़ा वेळ जमल तर काढ़ 
मी ही आहे इथे बसलेला 
असाच भांड माझ्याशी 
कुणीच येणार नाही आपल्या आड़ 
घरदार सांभाळून उरला सुरला वेळ काही.. 
जमल तर काढ़

-केतन सावंत 

Post a Comment

0 Comments