RSS 📚📖
गोळवलकर गुरुजी आणि डॉ हेडगेवार ही नाव ऐकून होतो. फोटो सुद्धा पाहिलेले पण ह्यांच एवढं कार्य काय? मुळात RSS म्हणजे काय हे सारे प्रश्न सोडवले ते 'विश्वातील अद्वितीय संघटन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' ह्या श्री रमेशभाई मेहता लिखित पुस्तकाने.
बरेच दिवस पुस्तक घरात होत पण वाचंल जात नव्हत. आता लॉकडाउनमुळे वाचायला सुरुवात केली आणि अक्षरशः गुंतत गेलो. म्हणजे अगदी संघाच्या स्थापने पासून ते आजपर्यंतचा प्रवास ह्या पुस्तकाने घडवला.
खरतर संघाबद्दच्या बऱ्याच चुकीच्या समजुती इथे दूर झाल्या. संघ कसा कार्य करतो, त्यांचा हेतू काय, कार्यप्रणाली काय.. ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तर हे पुस्तक देत. दै. प्रत्यक्षच्या🗞️ लेखमालेत बऱ्याचवेळा काही भाग वाचले गेले पण सलग वाचन झालं ते ह्या लोटस प्रकाशननाने प्रकाशित केलेल्या ह्या पुस्तकाने.
लेखक स्वतः अगदी बालपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत त्यामुळे सर्व घटना त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळे वाचन विश्वासपूर्ण होत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात संघ कसा अग्रेसर होता, धर्मांतरणाच्या विरोधात संघाने काय कार्य केले, वनवासी बांधवांसाठी संघ काय करतो हे सगळं ह्या पुस्तकात कळत. चार दिवसात हे पुस्तक वाचून झालं. खरंतर अजून लवकर व्हायला हवं पण असो.
ह्यापुढे संघाबद्दल कुठलंही वक्तव्य करताना आधी हे पुस्तक वाचा. मला खात्री आहे की जे संघाबद्दल उलटसुलट बोलत असतात त्यांना संघ कळलेलाच नसतो. हे पुस्तक वाचून संघ पूर्ण कळला अशातला भाग नाही पण निदान 25% टक्के भाग तरी आपल्याला माहीत होतो.
*पुस्तकाचं नाव - विश्वातील अद्वितीय संघटन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ* 🚩
प्रकाशक - लोटस पब्लिकेशन
लेखक - रमेशभाई मेहता

0 Comments