वल्ली
- पु ल देशपांडे
माणूस मोठा होणं आणि मोठा माणूस होणं हे साधण
तस कठीणच आहे. आता हेच बघा ना पुलं सारखी व्यक्ती आजन्मभर लोकांना फक्त हसवत होती आणि
अजूनही तरुणपिढी त्यांचं साहित्य वाचून तोच आनंद मिळवते. परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा
उचित वापर कसा करायचा हे पुलंकडून शिकण्यासारखं आहे. ह्या जगात दुःख आहे पण कुठेतरी
लोकांना निर्भेळ आनंद मिळावा म्हणून त्यांनी लिहिलं. नाटक, कथा, संगीत काय म्हणून त्यांनी
करायचं बाकी ठेवलं नव्हतं. आज सुद्धा अंतु बरवा असो नाहीतर सखाराम गटणे हि पात्र पुलंना
खरोखरच भेटली असतील का? मग जर भेटली असतील तर काय म्हणाली असतील असे एक ना अनेक प्रश्न
पडतात. आणि ज्याप्रकारे पुलंनी ते सादर केलं त्यावरून ह्या पात्रांशी आपण नकळत जोडले
जातो.
पुलं म्हणजे एक अजब रसायन आहे. आपल्या कार्याने
अनेक लोकांना स्वतःशी जोडणं आणि त्यांना हसण्याच्या सागरात डुंबवण हे खरोखरच महान कार्य
आहे. कधीही कुठेही कमरेखालचा विनोद नाही पण तरीसुद्धा आपल्या शब्दानी हसवून हसवून डोळ्यात
पाणी आणणारे पुलं.
माणसाला जगायला काय लागत? अन्न, वस्त्र, निवारा
ह्या मूलभूत पण शारीरिक गरजा झाल्या पण आत्म्याला समाधान देणार, त्याच्या चेहऱ्यावर
हसू आणण्याची मूलभूत गरज ह्या महाराष्ट्रातल्या आणि असंख्य मराठी लोकांच्या मनाची गरज
पुलंनी पुरवली. असं म्हणतात कि हसण्याने आयुष्य वाढत आणि पुलंनी आयुष्यभर लोकांना हसवून
त्यांच्या आयुष्यात एक दोन वर्ष तरी नक्कीच वाढवली असतील. सुनीताबाई, वसंतराव, भक्ती
बर्वे ह्यासारख्या ताकदीच्या कलाकारांच्या आयुष्याला पुलंनी सोन्याची किनार लावली.
आयुष्यच गणित असचं असत वजाबाकी, बेरीज पण त्यात थोडं हसू मिसळलं कि त्याला बहार येते.
पुलंचं साहित्य वाचलेल्या कुठल्याही व्यक्तीला
विचारलं तरी तो हेच सांगेल कि पुलं आहेत, ते कुठेच गेले नाहीयत. आपल्या असंख्य विनोदातून,
शब्दातून प्रत्येक वाचकाच्या मनात ते आजन्म चिरतरुण आहेत.

0 Comments