आता लक्ष्य एकच - बलुचिस्तान

            

             ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे, आणि कधी संपवायचं हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे आहे. या ऑपरेशनचा उद्देश स्पष्ट आहे: पाकिस्तानला एक असा धडा शिकवायचा, की तो देश पुन्हा उभाच राहू नये. भारताच्या या निर्णायक पावलांमागे एक सखोल सामरिक विचार आहे. ह्या लेखात आपण या ऑपरेशनचा व्यापक आढावा घेऊ, चीनच्या भूमिकेचा शोध घेऊ आणि भारतीय नागरिक म्हणून आपली भूमिका काय असावी, हे देखील स्पष्ट करू.

भारतीय नागरिकांची भूमिका:

        भारतीय नागरिक म्हणून आपली भूमिका काय असावी? पहिल्यांदा, कुठल्याही पक्षाचे समर्थक म्हणून केवळ आपल्या नेत्याने सांगितले म्हणून डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. प्रत्येक घडामोडीचा अभ्यास करा, तर्कशुद्ध विचार करा आणि मगच आपले मत ठरवा. आज माहितीच्या युगात सगळं इंटरनेटवर उपलब्ध आहे. फक्त शोधण्याची आणि समजून घेण्याची तयारी पाहिजे. आपण भारतीय नागरिक म्हणून आपल्याला माहिती मिळवून ठोस भूमिका घेतली पाहिजे. घडलेल्या घटनांचा मागोवा घेऊन, पुढे काय होऊ शकतं ह्याचा तार्किक अंदाज लावणे ही सुजाण नागरिकाची ओळख आहे.


चीनची कुटिल खेळी:

        खरा कुरापती काढणारा देश चीन आहे, हे आता जगजाहीर झाले आहे. पाकिस्तानमध्ये चीनची आर्थिक गुंतवणूक प्रचंड प्रमाणात आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या गुंतवणुकीमागचा हेतू स्पष्ट आहे—पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी करून आपला पाय रोवायचा आणि सामरिकदृष्ट्या भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करायचा. त्याचे मुख्य उदाहरण म्हणजे CPEC (China-Pakistan Economic Corridor). २०१५ साली सुरू झालेल्या या प्रकल्पावर आतापर्यंत ₹३,८९८ कोटी खर्च झाले आहेत. हा प्रकल्प चीनच्या 'Belt and Road Initiative' चा भाग आहे. चीनला थेट ग्वादर बंदरापर्यंत पोहोचवणारा हा मार्ग आहे. पाकिस्तानच्या मुख्य शहरांना जोडणारा हा मार्ग चीनच्या झिंजियांग प्रांतापर्यंत जातो. यामुळे चीनला थेट अरबी समुद्रात प्रवेश मिळतो.


ग्वादर पोर्ट आणि सामरिक महत्त्व:

            ग्वादर पोर्ट हे पाकिस्तानच्या आणि चीनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे बंदर आहे. व्यापार आणि सामरिक दृष्टिकोनातून हे बंदर चीनसाठी एक सोन्याची खाण आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये या बंदरावर हल्ला झाला असता तर चीनला थेट युद्धात खेचल्यासारखं झालं असतं. पण, भारताचं लक्ष फक्त पाकिस्तानला अशा स्थितीत ठेवायचं आहे की तो पुन्हा कधी उठूच शकला नाही पाहिजे. जसं बॉडी व्हेंटिलेटरवर असते, तसं पाकिस्तानचं अस्तित्व फक्त तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालू ठेवायचं, पण स्वतःची उभी राहायची ताकद राहू नये, अशी रणनीती भारताने आखली आहे.



भारताची धडाडी आणि राजकीय ऐक्य:

        महासत्ता असणारे देश म्हणतात की 'दोन्ही देशांना शांतता राखा' असे समजावून सांगा. पण आता भारत कोणाचाही ऐकणारा नाही. आपल्याला जे योग्य वाटेल आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जे आवश्यक आहे, तेच पाऊल उचललं जाईल. विशेष म्हणजे, सामान्यतः एकमेकांवर टीका करणारे विरोधी पक्ष देखील सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. हेच भारताचं खरे सामर्थ्य आहे—जेव्हा देशावर संकट येतं, तेव्हा आपण सगळे एकत्र येतो.

विजय निश्चित आहे:

        आता फक्त सतर्क राहण्याची गरज आहे. भारताने ज्या ताकदीने हे पाऊल उचललं आहे, ते पाहता विजय आपला झालेलाच आहे. ऑपरेशन सिंदूर ही एक सुरुवात आहे, ज्यामध्ये पाकिस्तानला कायमचं धडा शिकवायचा आहे. नागरिक म्हणून आपली भूमिका जागरूक राहण्याची आहे. माहिती मिळवा, तर्कशुद्ध विचार करा, आणि आपल्या देशाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा. कारण विजय निश्चित आहे!


ONLY BEST OF THE FRIENDS AND WORST OF THE ENEMIES VISIT US! 

- INDIAN ARMY


धन्यवाद 

केतन सावंत  

Post a Comment

1 Comments

  1. Khup Rochak views... Abhyaspoorna post...
    Ambadnya

    ReplyDelete