मी आणि श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे





                                           २१ डिसेम्बर २०१९ आयुष्यातला सगळ्यात संस्मरणीय दिवस. खरतर त्या दिवशी मी  माझा राहिलोच नव्हतो. मी त्यांना भेटलो त्यांनी जिंकलं. माझी भेट झाली - ऋषितुल्य श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी त्यांच्या पुरंदरे वाड्यातच. ह्यासाठी मी  आभार मानेन ते म्हणजे माझे सद्गुरू अनिरुद्ध, प्रतापराव टिपरे, कौस्तुभ कस्तुरे,  मित्र स्वप्नील, माझी पत्नी, वहिनी आणि चिकू...माझी भाची. 

 

बाबासाहेब मला मोडी लिपी लिहून दाखवताना  


२२ डिसेम्बर ला माझा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने यावर्षी बाबासाहेबाना भेटायचंच असं ठरवून टाकल. आणि प्रतापराव टिपरेंकडून रीतसर भेटीची वेळ घेऊन आम्ही निघालो. पुण्यात पोहोचल्यावर त्यांना फोन केला आम्ही येतोय. पण बाबासाहेबांचं घर शोधायला मला वेळ लागला. इतका कि मी दोन वेळा त्यांच्या दारासमोरून गेलो तरी मला कळलं नाही. असो आत जाऊन विचारलं तेव्हा कळलं कि जाणता राजाची तयारी चालू होती. त्यामुळे उशिरा आल्यामुळे मला दिलेली वेळ निघून गेली  होती. असो पण बापू म्हणतात ज्या गोष्टी घडतात त्या दत्तगुरूंच्या इच्छेने होतात. मी पुन्हा वेळ मागितली तेव्हा  संध्याकाळी वाजता या पण फक्त ५ मिनिटच वेळ मिळेल. बाबासाहेबांशी २ क्षण जरी बोलायला मिळाल असत तरी मी खुश झालो असतो. पण मला त्यांनी चक्क ५ मिनिट दिली म्हणून मी आनंदात होतो. नंतर दुपारी जेऊन आम्ही पावणे चार वाजताच त्यांच्या घराबाहेर येऊन थांबलो. बरोबर ४ वाजता त्यांनी बोलावलं. दरवाज्याच्या चौकटीतून आत डोकावलं  तेव्हा त्यांनी खूप आनंदाने डोळे मिचकावले आणि आत या अशी खूण केली. आम्ही आत गेलो. मग ओळख झाली. त्यांना येण्याचं कारण सांगितलं तेव्हा त्यांनी माझा वाढदिवस म्हणून आनंदाने टाळ्या वाजवल्या. मग थोड्यावेळाने मी त्यांना विचारलं -


"बाबासाहेब  शिवचरित्रातून काय काय शिकण्यासारखं आहे?"


ते म्हणाले "बाकीचं मी नाही सांगू शकत पण मी फक्त मी जे पाळतो ते सांगतो. दिलेली वेळ मी नेहमी पाळतो. (इथे मला सकाळी त्यांच्या भेट न होण्याचं कारण उमगलं).. मग ते  पुढे म्हणाले 


"तुम्ही शिवचरित्र वाचलं तुम्हाला आवडलं मला आनंद झाला. पण आता तुम्ही सुद्धा अभ्यास करा आणि ह्यात काही चुकीचं सापडलं तर माझ्याकडे घेऊन या. आपण सगळे संदर्भ पडताळून पाहू आणि बरोबर वाटलं तर पुढच्या आवृत्ती मध्ये बदलू "

बाबासाहेब पुरंदरे मला शिवचरित्रावर स्वाक्षरी देताना 


मी त्यांच्याकडे फक्त पाहत राहिलो. आजच्या मितीस त्यांचं वय ९९ आहे. मी भेटलो तेव्हा ९८ होत. १९५७ साली जे पुस्तक प्रकाशित झालय. ज्याच्या आजवर लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. जे पुस्तक वाचून तीन पिढ्या वाढल्या, ज्यांना खुद्द शिवछत्रपतींच्या घराण्याने शिवशाहीर हि पदवी बहाल केली त्यांच्याकडून असं ऐकणं वेगळा अनुभव होता. 


माणसाने नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवावेत ह्या म्हणीचा मूर्तिमंत आविष्कार मी तिथे पर्वतीला पाहिला. 


आम्ही निघालो तेव्हा त्यांनी आपल्या जवळचा पेढा आम्हाला दिला. त्यांच्या चरणावर मस्तक टेकवून त्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुरंदरे वाड्याबाहेर पडलो. तेव्हा ४. ५० झाले होते... 


- केतन सावंत 

=========================================================================

(सूचना :- ह्या लेखामधील शब्द आणि फोटो केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)


Post a Comment

3 Comments

  1. मित्रा मस्त अनुभव, असेच पुढे प्रगती करत राहा. बापूंचे आशीर्वाद तुझ्या सोबत आहे.अंबज्ञ

    ReplyDelete
  2. खुप सुंदर...😘👌

    ReplyDelete
  3. सुवर्ण क्षण!

    ReplyDelete