बायको


बायको 
तू गेलीस तेव्हा काहीच वाटल नाही
आज घर भकास  वाटतय
खिडक्या,दरवाजे,
कपाटावरची  धूळ
सगळ्यांनाच  तुझी सवय झाली होती
आता तेहि बन्द होण्याआधी जरा अडखळतात
उशांची अभ्र, कोपऱ्यातली झाड़ू
हे सार पाहिल  की तू आठवतेस
पण तुला पहिल कधी  बघितल
ते आठवत नाही
कदाचित तिलाच  "बायको" म्हणतात
सकाळच्या डब्यापासून ते रात्रीच्या जेवणामधे
ती  लग्नानंतर कधी  हरवते हे
ना तिला कळत  ना आपल्याला
पण एवढ मात्र नक्की
कदाचित तिलाच " बायको" म्हणतात
सहज म्हणून तिला जवळ घेतल
तिच्या खोबणीत  गेलेल्या डोळ्यांवरून अलगद हात  फिरवला
आणि तिला ती  माझी "बायको" असल्याची जाणीव झाली
आता याच कौतुक करव की अजुन काही
पण तुझ्या आठवणीत ह्या भकस घरात अजुन एक कविता जन्मली
कदाचित तिलाच "बायको" म्हणतात

- केतन सावंत
गोरेगाव पूर्व  

Post a Comment

0 Comments