हरी ॐ
सफर कैलीग्राफी जगताची ह्या सदरातला पुढचा भाग लिहितोय. आता बऱ्यापैकी सगळे जण कैलीग्राफी करायला लागले असतीलच आणि अगदीच जमत नसेल तर काळजी नको फ़क्त सराव चालु ठेवा, ते म्हटलयच ना कोणीतरी की "प्रयत्नांती परमेश्वर" अगदी तसेच. आपण जे काही करतो त्यावर आपला पूर्ण विश्वास असायला हवा आणि त्याचबरोबर शक्यतो आपल्या मनातल जे काही आहे न ते कुठेतरी आपण मोकळ करायचा प्रयत्न करत असतो पण तो सापडत नाही, मग आतल्या आत आपण घुसमटत राहतो पण कलाकारांच तस नाहिय… कलाकाराना त्या परमेश्वराने अशा कला बहाल केल्या असतात ज्याद्वारे तो स्वताला त्याच्याशी जोडून घेतो; कवी त्याच्या कवितेमधून त्याच्या भावना मांडत असतो, चित्रकार, गायक हे सगळे त्यांच्या चित्रातुन , गाण्यातून आपल मन मोकळ करत असतात
कवी त्याच्या कवितांमधून त्याच्या आयुष्यात घडलेल्या किंवा एखादी ठराविक घटना मांडत असतो म्हणजेच कविता चार ओळींची पण अर्थ मात्र ओतप्रोत भरलेला तसच आपल्या कैलीग्राफीच; कैलीग्राफी मध्ये सुद्धा आपल्याला एका स्ट्रोक मधून त्या शब्दाचा अर्थ उलगडून दाखवायचा असतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला त्या शब्दाचा अर्थ त्या कैलीग्राफी च्या स्ट्रोक्स मधूनच सगळ्यांपर्यंत पोहोचवावा लागतो. आता माझी खालील कैलीग्राफी बघा.

आता ह्या कैलीग्राफी मध्ये बघाल तर तुम्हाला काही ठराविक गोष्टी प्रकर्षाने दिसून येतील. १. तिलक लावल्याचा स्ट्रोक २. मर्द शब्दावरचा रफार, आता ही कैलीग्राफी समजून घेऊया, मर्द मराठा हा शब्द उच्चारल्या बरोबरच आपल्या डोळ्यासमोर येतो तो फेटे घातलेला, भरदार मिश्या, बळकट दंड, कपाळावर तिलक लावलेला. बरोबर ना? मग मला ह्या सगळ्या गोष्टी एकाच शब्दात, एकाच कैलीग्राफी मधून मांडायच्या होत्या. अजुन एक महत्त्वाच तुम्ही जे काही बनवणार त्याची एक साधी मांडणी तुमच्या डोक्यात तयार असू दे म्हणजे वेळ फुकट जाणार नाही, तर मी तो दणकटपणा दाखवण्यासाठी बैकग्राऊँड ला भिँतीचा इफ़ेक्ट दिला आहे त्याच बरोबर इलस्ट्रेटर मध्ये उपलब्ध असलेल्या ब्रश चा वापर करून मी "तिलक" चा इफ़ेक्ट दिलाय. आता गम्मत अशी आहे की तुम्ही एकच ब्रश तुम्हाला हव्या तितक्या प्रकार वापरु शकता कारण डिजाइनिंग साठी काहीच मर्यादा नाहियत, तुम्ही तुम्हाला हव्या तश्या डिज़ाइन बनवू शकता....
ॐ सुदर्शनाय नम: हे नाम घेऊन त्यावर कैलीग्राफी केली, आता हयात महत्त्वाच काय आहे तर सुदर्शन चक्र दाखवायच आहे म्हणून मई पुन्हा ह्या वेळेस दुसऱ्या ब्रश चा वापर केला आहे आणि चक्राचा इफ़ेक्ट दिला आहे अशा प्रकार तुम्ही वेगवेगळ्या ब्रश चा वापर करून वेगवेगळ्या कैलीग्राफी शकता आणि पेपर खराब होईल, फुकट होईल हां विचार करत बसू नका कारण सुरुवातीला हे होईल पण जेव्हा तुमचा हाथ बसेल त्या वेळेस अस होणार नाही,
तर आज आपण शब्दातल्या भावनाना कैलीग्राफी मधून कागदावर आपल्या डोळ्यासमोर कस उतरवायच हे शिकलो मग सुरु करा स्ट्रोक्स मारायला आणि उतरवा आपल्या मनातल.......... जाता जाता अजुन एक कैलीग्राफी ख़ास तुमच्यासाठी
हरी ॐ ॥ श्रीराम॥ अम्बद्न्य

1 Comments
Best of Best Callagraphy....bro
ReplyDeletekeep it up....
Hari Om