गझल - किनाऱ्यापाशीच या

गझल

किनाऱ्यापाशीच या, तिने समुद्र सांडला होता
जाता जाता का होईना ,पण मला माझ्यातून चोरला होता

लुटारुच नव्हती ती , तरी  आरोप मी लावला होता
बंद गजाआडून आज, फैसला मी  केला होता

अता  तिच्या आठवणींचा , गुलाब तेवढा ओला होता
बाकी काटा हृदयातला, हृदयातच  पुरला  होता

नाही म्हणून गेली तरी, ठसा उमटला होता
सांडल्या समुद्रात या, माझा चंद्र विस्कटला  होता

                                             - केतनसिंह सावंत


Post a Comment

1 Comments