गझल
किनाऱ्यापाशीच या, तिने समुद्र सांडला होता
जाता जाता का होईना ,पण मला माझ्यातून चोरला होता
लुटारुच नव्हती ती , तरी आरोप मी लावला होता
बंद गजाआडून आज, फैसला मी केला होता
अता तिच्या आठवणींचा , गुलाब तेवढा ओला होता
बाकी काटा हृदयातला, हृदयातच पुरला होता
नाही म्हणून गेली तरी, ठसा उमटला होता
सांडल्या समुद्रात या, माझा चंद्र विस्कटला होता
- केतनसिंह सावंत

1 Comments
Awesome Gajhal Ketansinh ...Bahot khub
ReplyDelete