मधली सुट्टी

                         

                           खरतर खेळायला जायची इच्छाच  नव्हती, त्यात उठलो देखील उशिरा म्हणुन कंटाळा करात होतो पण शेवटी ठरवल नाही जायचे आहे  खेळायला. आणि साधारण १५ मिनिटांत तिकडे पोहोचलो आणि पाहतो तर तिथे आधीच खेळ  सुरु झालेला. " साखळी - साखळी ".
                                हां फोटो पाहूनच तुम्हाला कल्पना येईल की सर्व वयोगटातील व्यक्ति एकत्रच आणि तेवढ्याच उत्साहाने खेळत  होते. आजकाल फेसबुक आणि व्हाटस एप वर बऱ्याचदा एक msg  फिरत असतो, आजकाल बालपण  हरवल, पुन्हा जूने दिवस कोणीतरी दया परत, आयुष्याला रिवाइंड च बटन असत तर? अशा अनेक गोष्टी त्यात असतात; आणि एक सर्व सामान्य माणूस त्यात लक्ष न घालता सहजपणे डिलीट करतो पण त्याने समस्या सुटत  नाही पण हे इतरांकरिता....  आमच्या साठी  आणि खेळायची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्ति साठी  मग ती  श्रद्धावान असो वा नसों, आणि सगळ्यात महत्त्वाच ज्याला खेळायची इच्छा आहे अशा प्रत्येकाला आमच्या सद्गुरुनी आमच  बालपण परत दिलय.

                                  तेहि कस  तर जूने खेळ नवे मित्र, कारण जसा  काल बदलतो तसा बदल आपल्यातही  घडवावा लागतो आणि तो सद्गुरुच करू  शकतो, आज ह्या बोन्साई  स्पोर्ट्स मधला प्रत्येक खेळ  खेळताना हाच भाव दॄढ़  होत  चाललाय की आमच ट्रांसफॉर्मेशन होतय, आणि हे सर्व करणारे आमचे सद्गुरु अनिरुद्ध बापू. 
                  जरा फक्त आठवून बघा  तुमची शाळा भरलेली आहे. वर्गात टीचर शिकवतायत आणि तुमच संपूर्ण लक्ष फ़क्त मधल्या सुट्टी कड़े आहे. कधी  एकदा मधल्या सुट्टीची घंटा वाजतेय  आणि आपण  धिंगाणा  घालतोय अस होत, मग आता तरी  आपण  वेगळ काय करतोय सोमवार सुरु झाला की आपण वाट बघत असतो "रविवार ची" आणि करतो काय तर  उशिरा उठतो आंघोळ नाश्ता वगैरे करून  दुपारी मस्त चिकन खाऊन ढाराढुर झोपलेलो असतो.  ही रविवारची  सुट्टी ही मधल्या सुट्टी सारखी एन्जॉय करायची असते.
           
                    खरच एक दिवस ही अशी सुट्टी घालवून बघा.... तो सद्गुरु तुमच्यात उचित बदल उचित वेळी नक्कीच घडवेल. अधिक माहिती साठी पुढे दिलेल्या लिंक  वर  क्लिक करा Bonsai Sports
 - केतनसिंह सावंत
                                                हरी ॐ । श्रीराम ।  अम्बद्न्य  

Post a Comment

0 Comments