काकणांचे भास तुझ्या असती नाजुक जरी
उन कोवळे श्वासांचे हे झूलते.. रुळते मौनापरी
गलबत हे लावून मनाचे किनारी, मीच मांडला व्यापार
भाव वेगळे, श्वास अनोळखी तुझे, अन चेहरा निर्विकार
समाधीच्या रांगेमधूनी ओळखलेस माझेच थडगे
गुलाब घेऊन गेलीस परि, थडग्यावर सोडुनी काटे
मोजले में अंतर शब्दांचे..भासांचे... वेड्या आरश्यापरि
ओळख पुसली, अन मीच हसलो स्वत:वरती थडग्या आतुनी
- केतन सावंत

2 Comments
Superb poem Ketan!!!
ReplyDeletehari om shreeram ambadnya suneetaveera
Delete