माझ्या ओळखीतल्या एका काकांच्या पायाच cancer च ऑपरेशन झाल, वय साधारण ८० च्या आसपास.. काकुंच वय देखील ७५ च्या पुढेच असाव. काका टाटा हॉस्पिटल मध्ये एडमिट होते, दोघांनाही मूल बाळ नाही... दोघांचे नातेवाईक कोण तर फ़क्त बापुपरिवार... कुठल्याही स्वार्थाशिवाय, कुठल्याही हेतुशिवाय निस्वार्थपणे सेवा करायला आम्हाला बापुनी शिकवल; तर आता काका एडमिट झाल्यावर काकू तरी किती करणार मग आम्हा सगळ्या बापू भक्तानी तिकडे त्यांच्या मदतीला जायच ठरवल, सगळे पुरुष बापुभक्त दिवसा आणि रात्रि काका काकुंसोबत होते, काकू रात्रि हॉस्पिटल जवळच राहणार्या तिच्या मैत्रिणी कड़े झोपायला जायची आणि सकाळी येताना काकांसाठी नाश्ता घेऊन यायची.. मला एक दिवस तिकडे मदतीला जायची संधी मिळाली,
......... cancer पेशंट, घाण, विचित्र जखमा, अस एक हॉस्पिटलच चित्र माझ्या डोक्यात फिट बसल होत, परंतु प्रत्यक्षात मी तिथे पोहोचलो तेव्हा तिकडची साफ़ सफाई वगैरे बघून खरच हैराण झालो,पण खरच माझ्या अपेक्षेपेक्षा खुप व्यवस्थितपणे स्वच्छ ठेवल होते....... त्या दिवशी त्या दोघाना बघून मला प्रेमाचा वेगळाच अर्थ कळला.. बायको म्हणजे काय? बायको किती काय काय करते आणि काय काय करू शकते तिच्या नवरयासाठी ह्याच मूर्तिमंत उदाहरण मी पाहात होतो..खरच त्या दोघांना बघून डोळ्यात पाणी आल, काकूच सुद्धा २ वर्ष आधी knee replacement झाली होती त्याना सुद्धा चालताना थोडासा त्रास होतो पण तरीही त्या सगळी काम करत होत्या, कुठेही घाणीचा लवलेश नाही, पदर कमरेत खोचुन ती एखाद्या तरुण गृहिणी सारखी त्यांची सेवा करत होती.. काकांची काळजी घेताना त्यांच्या चेहर्यावर कुठल्याही प्रकारचे किळसवाणे हावभाव नाहीत अगदी प्रेमाने त्या त्यांची काळजी घेत होत्या..
ऑपरेशन नंतर चार दिवसांनी काकाना जेवायची, पाणी प्यायची डॉक्टरांनी परवानगी दिली...तेव्हा काकाना भरवतानाचा काकुच्या चेहर्यावर मातृत्व आणि सहधर्मचारिणी हे भाव एकतत्रित दिसत होते, तेव्हा वाटल येस ! हे खर प्रेम, ह्यालाच प्रेम म्हणतात... बायकोची सुंदर व्याख्या त्या दिवशी काकुनि मला दाखवली होती... व्याख्या बघणारा जगातला बहुधा मी एकटाच असेन, पण त्या दिवशी मला आयुष्याला पुरेल एवढा खजिना मिळाला..... गेल्या आठवड्यात त्यांना डिस्चार्ज मिळाला, दोघ आता एकटे असतात... त्या दोघांच्या विश्वात आलेल्या एक मोठ्या वादळाला त्यांच्या सदगुरुंच्या, बापूंच्या आशिर्वादाने त्यांनी परतवून लावले होते... तो एक दिवस मी अनुभवला कायम स्मरणात ठेवण्यासाठी आणि काकूच एक वाक्य आठवतय ती सारख मला म्हणत होती.. तुमच सगळयांच बापू चांगलच करणार.. !!!
खरतर त्या दिवशी त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी आयुष्यभर जपू शकेन एवढा खजिना त्यांनी दिला होता... आणि बायको नावाच्या जुन्या नात्याची मला नव्याने ओळख करुन दिली होती...
- केतन सावंत

0 Comments