त्याला गर्द झाडांमध्ये वसलेल लाल मातीची पाऊलवाट असलेल घर आवडायच, लहानपणापासून गावी राहिल्यामुळे शहरात त्याच मन रमत  नव्हत; नाही म्हणायला पोटासाठी इतरंसारखा तोही मुंबईत आला होता... उच्च शिक्षण, दिसायला सुद्धा बरा  होता... काम चालु होत, पैसा यायचा, खर्च वाढायचे... हळूहळू त्याला त्याच्या ऑफिस मध्येच काम करणारी त्याची जुनिअर  आवडायला लागली.. दिसायला सुन्दर तरी  तोरा मात्र एखाद्या घरंदाज मुलीसारखा, गर्विष्ठ, त्यातच हां भोळा तिच्यावर भुलला, मला  तर कधी  कधी  वाटायच की "प्रेम आंधळ असत" ही म्हण बहुधा ह्या दोघांवरूनच रूढ़ झाली असावी. असो. कालांतराने तिच्या लाडांपायी ह्याचे खर्च वाढायला लागले, लग्नाच्या शपथा घेऊन मोकळी झालेली ती अचानक म्हणाली "आता आपण लग्न नाही करू शकत, माझ दुसऱ्या मुलावर प्रेम आहे" काय होतय हे कळायच्या आतच त्याच्या पायखालची जमीन सरकली... जाग आली  तेव्हा हॉस्पिटल मधे होता..पण शेजारी ती  नव्हती... आई बाबा होते... रिपोर्ट सांगत होते मेंदु मधे रक्ताच्या गुठळया झाल्या आहेत... आई बाबा नुकताच वयात आलेला मुलगा आपल्या पासून दूर जातोय हे हतबल होउन बघत होते.. ना दवा कामाला आली  ना दुवा... त्याला त्याच्या धूसर होत  जाणाऱ्या नजरेत मात्र ते गर्द झाडांमधल घर, लाल मातीची पायवाट.. आणि मागच्या अंगणात चुलीवर भाकऱ्या भाजणारी त्याची आई दिसत होती..

-केतन सावंत 

Post a Comment

2 Comments