"समिधा.. ए समिधा" विशाल समिधाला हाक मारत होता. समिधा स्वयंपाक घरात शेगडी समोर उभी होती. चहाच आधल चुलीवर ठेवल्याच तिला भान नव्हत, ती पायचा अंगठा जमिनीवर घासत शून्यात नजर लावून बसलेली.. चहा उकळल्याच्या वासाने ती भानावर आली, ऑफिसला जायची वेळ झाली तरी विशाल घरातच होता.. आज ट्रेन चूकणार या काळजीने तो जरा कुरकरतच बाहेर पडला आणि समिधा पुन्हा कामाला लागली...
जरा अंगात कुण कुण असल्यामुळे तिने ऑफिसला आज रजा टाकली होती.. दुपारी काम आवरुन बसली तेव्हा तिला पुन्हा रात्रीचा प्रसंग आठवला आणि ती थोडीशी घाबरली पण तिने सावरल स्वताला...
काल स्वप्नात पाहिलेला शंकर मामा.. त्याला काही झाल तर नसेल? कसा असेल तो? हजार प्रश्न मनात यायला लागले.. तसा तो काही आईचा सख्खा भाऊ नाही पण अख्ख गांव त्याला शंकर मामा हाक मारायच मग ओघाने तो आमचा सुद्धा मामा झाला.. काही नाती रक्तांपेक्षा जास्त जवळची असतात त्यापैकी एक शंकर मामा होता.. त्याचा आमच्या घराशी विशेष घरोबा होता..
दुपारची वेळ झाली की आम्हाला शाळेत सोडायला तो दारावर यायचा.. मध्यम बांध्याचा, काळेभोर डोळे, झुपकेदार नाही पण बऱ्यापैकी मिशा, अंगात कायम चपला, एक लुंगी आणि वर शर्ट; त्याची मुलबाळ , बायको, आईबाबा यापैकी गावात कोणालाच काही माहीत नाही पण आमच्या बाबानी एकदा विषय काढला होता आणि त्याने मोडक तोडक उत्तर देऊन विषय टाळला, त्याच्या कानड़ी टोन वरुन वाटायच तो मूळचा कर्नाटक - बेळगावकड़चा पण तो म्हणतो तो तिकडे कधी गेलाच नाही त्या बाजूला.. फक्त बरीच वर्ष एका उडीपी वाल्याकडे काम केल्याने अस झाल असेल अस तो म्हणतो आणि समोरच्यालाही त्याच हे सांगण पटत....
तसा हा शंकर मामा ह्याच खर नाव कोणालाच माहीत नाही पण गावच्या वेशिवरच्या पिंपळाखाली असलेल्या शंकराच्या पिंडीची ह्याने गावात आल्यापासून मनोभावे सेवा केली, आणि तेव्हा पासूनच बहुधा ह्याला सगळे शंकर शंकर हाका मारु लागले आणि अख्ख्या गावाला शंकर मामाच्या रुपाने एक गोड़ माणूस मिळाला, समिधा मधेच जावून तांदूळ निवडायला बसली; डोक्यातून शंकर मामा मात्र काही केल्या जात नव्हता.. आज अचानक एकाएकी अस अस्वस्थ होण्याच कारण म्हणजे कालच रात्री तिला स्वप्नात तोच शंकर मामा त्या गावच्या शंकराच्या पिंडीची पूजा करताना दिसला आणि नेहमीप्रमाणे त्याने तिला हाक मारली.. समीधे... ए समिधे... ह्या शब्दानीच ती खडबडून जागी झाली होती... त्या शंकर मामाच्या खुशालीच काही कळत नव्हत; त्याच्याशी रक्ताच नात नव्हत तरी लळा होता आणि समिधाच्या लग्नात मामा म्हणून नवऱ्या मुलीला बोहल्यावर घेऊन येण्याचा मान समिधाच्या वडिलांनी म्हणजेच सम्पतरावानी शंकर मामा ला दिला होता ..
त्याच्या आठवणीने तिचे डोळे पाणवले पुन्हा एकदा प्रयत्न करावा म्हणून तिने बाबाना फोन केला पण फ़ोन काही लागला नाही.. तिची बेचैनी वाढतच होती.. आता तो शंकर मामा जवळपास म्हाताराच झाला असेल, त्याला दिसत पण नसेल धड़, कुठे जेवत असेल मी होते तोपर्यंत आमच्याच कड़े जेवायचा, हिच्या लग्नात तो जितक्या आनंदाने नाचला तितकाच एका हळव्या मामा प्रमाणे रडला देखील, त्याची ही कृतीच त्याच समिधावरच प्रेम दाखवत होती.. शेवटी तो सुद्धा समिधाला स्वत:ची मुलगीच मानायचा ना..
तीच सारख बाबाना फ़ोन करण चालूच होत आणि एकदाचा फ़ोन लागला तेव्हा सगळ बोलून झाल्यावर बाबांकडे तिने शंकर मामाचा विषय काढला तसा बाबांचाहि आवाज जड झाला, ज्या पिंपळा खालच्या पिंडीची ह्याने आजन्म सेवा केली त्याच पिंडी शेजारी दुपारी झोपला असताना त्या पिंपळाची भली मोठी फांदी त्याच्यावर पडली आणि हां तिथल्या तिथे कोमात गेला; आधी नाही म्हणायला गावतले वैद्य वगैरे केले पण काही फरक पड़ला नाही मग शेवटचा प्रयत्न म्हणून गावकऱ्यांनी तालुक्याच्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये नेले परंतु काही उपयोग झाला नाही आणि ५-६ दिवसातच तो कोमा मध्येच हे जग सोडून गेला..
तो गेला तेव्हा त्याचा चेहरा चिंतामुक्त होता, ना अंगावर एकहि खरचटल्याची खूण होती.. डॉक्टरही आश्चर्य चकित झाले होते .. बहुधा त्याच्या तपस्येला प्रसन्न होऊन त्याला त्याच्या भोळ्या शंकरानेच मुक्त केल असेल नाहीतर मोक्ष प्राप्ती झाली असेल अस काहिबाहि आता गावातले लोक म्हणतात... खरखोट तो परमेश्वर जाणो पण आतासुद्धा त्याने त्याच्या लाडक्या समिधेला जाताना हाक मारली होती एवढ मात्र खर होत...!
- केतन सावंत

0 Comments