जुडवा २





                  कालच "जुडवा २" हा नवीन हिंदी सिनेमा पाहिला. १९९७ साली पहिल्यांदा रिलिज झालेल्या सिनेमाचा हा दुसरा भाग. मूळ कथानक तसंच ठेऊन वरून फक्त थोडा मसाला, आणि मारा मारी टाकली तर नवीन असं ह्या सिनेमा मध्ये काही पाहायला मिळत नाही.

                                               मुंबईत जन्मलेली हि जुळी बाळ एक गुंडाच्या हाती लागत आणि दुष्मनीतून धोका असल्यामुळे पोलिसांच्या सांगण्यावरून एका मुलाला घेऊन लंडन मध्ये जाऊन स्थायिक झालेला सचिन खेडेकर. सुदैवाने गुंडाने पळवलेलं बाळ वाचत आणि आणि एका स्थानिक बाईच्या हाती  लागत; तीच त्याला वाढवते आणि मग कथानक सुरु होत. चित्रपटात काही मराठी डायलॉग चा वापर करण्यात आला आणि पण तो तितकासा यशस्वी झालेला नाही  नवीन चित्रपटात दुहेरी भूमिकेत वरून धवन याने आपली भूमिका चांगली बजावली आहे.. त्याच बरोबर सचिन खेडेकर, अनुपम खेर, jacqueline fernandez, तापसी पन्नू, अतुल परचुरे, राजपाल यादव, जॉनी लिवर, प्रणव मल्होत्रा, अली असगर  यांच्या भूमिकांनी सजलेला हा चित्रपट.
   
                                                 चित्रपटात जी जुनी गाणी नव्याने सादर केली आहेत ती सोडिली तर एकही नवीन गाणी लक्षात राहत नाही. २. ३० तासाचा हा सिनेमा तुमचं मनोरंजन करतो पण फक्त त्यांच्यासाठीच ज्यांना अशा प्रकारचे सिनेमे आवडतात. चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले मनोज जोशी हे सुद्धा आपली वेगळी छाप आपल्या मनावर सोडून जातात. काल्पनिक कथांवर आधारित हा सिनेमा पाहतात आपल्याला जुन्या "जुडवा" ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शेवटी व्हिलन ला सोडून का देतात यायचं कारण कळत नाही. शेवटच्या सिन मध्ये झालेली सलमान खान ची एन्ट्री लक्षात राहण्यासारखी आहे. इथेही त्याने २ मिनिटाच्या रोल मध्ये त्याची छाप सोडली आहे. तर असा हा एकूणच माल मसाला, मारधाड असलेला सिनेमा २ तास निखळ मनोरंजना साठी पाहू शकता.

- केतन सावंत 

Post a Comment

0 Comments