मालती

             "किती शांतपणे झोपलाय.. दिवसभर चिडचिड असली तरी झोपल्यावर किती अगदी लहान बाळासारखा दिसतो." शर्वरी प्रसादच्या केसातून हात  फिरवत म्हणाली. ४ वर्षापूर्वी ऑफिस मध्ये सहज धक्का लागला म्हणून सुरु झालेली बोलणी गप्पांमध्ये कधी बदलली कळलच नाही आणि मग आपोआप गप्पा, मैत्री, प्रेम आणि लग्न असा प्रवास झाला .. सुमन तेवढ्यात जागी होत  होती म्हणून शर्वरीने अलगद जाऊन थोपटल तशी सुमन पुन्हा झोपली. आणि ही पुन्हा प्रसाद शेजारी येऊन बसली.. 
                गेले ५-६ महीने त्याच्या मनात खद खदत असलेला असंतोष आज मोकळा झाला तसा हां सुद्धा मोकळा झाला.. शर्वरी स्वत:त  हरवत चालली होती.. सासऱ्यानी प्रॉपर्टी दोन भावांमध्ये समान वाटून द्यायची जाहिर केल्यावर सुधाकर भावोजीना का खटकल कोण जाणे त्यानी सरळ सरळ संपूर्ण प्रॉपर्टी वर हक्क दाखवला.. सासुबाईनसाठी हां एक धक्काच होता.. मोठा अस काही वागेल हे त्याना कधी वाटलच नव्हत... पण  आता निर्माण झालेला हां तिढा सोडवायला तर हवा होताच...सासरे वय वर्ष ७४; तरी हातात अजुन काठी आलेली नाही पण म्हणतात ना सुधाकर च्या ह्या आकस्मिक बदलामुळे ते पार हादरले होते.. पण सावरल त्यानी स्वताला आणि ह्या रोजच्या कटकटीमुळे प्रसादही आजकाल वैतागु लागला होता.. सुधाकर  भावोजी पैशांपुढे नाती विसरत चालले होते.. आणि त्याना जाणीव करून देण गरजेच होत, तसे भावोजी इतके कसे बदलले हे शर्वरीला कळतच नव्हत.. सुमन झाली तेव्हा तेच "माझी पुतणी माझी पुतणी " म्हणून घरभर नाचत होते... प्रसाद कडेही जेव्हा लग्न खर्चात पैसे कमी पडले तेव्हा सुधाकर भावोजीनी सगळ सांभाळल होत... आणि आज तेच  अस वागतायत म्हणून सगळ्यांनाच विचित्र वाटत होत .. आणि आज तर प्रसाद शर्वरीच्या गळ्यात पडून रडला होता.. आणि त्याच हे वागण शर्वरीला अस्वस्थ करत होत... प्रसादला ना प्रॉपर्टीची हाव होती ना पैशाची त्याला फक्त त्याच्या मोठ्या भावाच जे वागण होत  ते खटकत होत आणि  म्हणून तो अस्वस्थ होता... 
                   मालती.... मालती म्हणजे त्यांच्या घरातल एक अजब रसायन होत..  महिन्यांपूर्वी शेजारच्या पाठक काकुनी आणलेली ही १०-१२  वर्षाची अनाथ पोर.. काळेभोर केस.. घारे डोळे... आणि गालावर पडलेली एक खळी..... अशी ती सावळ्या रंगाची पोर इथून तिथुन घरभर नाचत असायची घरच्यानीही तिला कधी वाईट वागवल नाही.. एवढी सूंदर पोर पण "मुकी" .. पण भावना मात्र सगळ्या आपल्यासारख्याच... तेव्हढ एक सोडल तर बाकी तिच्यात नाव ठेवण्यासारख काहीच नव्हत... मोठा तसा कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असायचा पण  रात्री उशिरा घरी यायचा...  मोठ्याच लग्नही झाल नव्हत..त्याची कारण वेगळी होती , पण मुल मात्र त्याला आवडायची पण प्रॉपर्टीचा वाद झाल्यापासून त्याने सुमनलाही जवळ करण बंद केल..... 
                       पण कस कोण जाणे, ह्या मालतीला त्याचा लळा  लागला होता.. तो उशिरा रात्री घरी आला तरी ही जागी असायची.. ह्याच्याशी खेळायचा खूप प्रयत्न करायची पण हा मात्र घुम्या झाला होता.. त्याची कोंडी झाली होती ना , घरी सगळे असून बोलायला जमत नाही आणि बाहेर असलो तरी घरच्यांच्या आठवणींशिवाय दिवस जात  नाही आणि ही कोण कुणाची पोर मला इतका लळा  लावते आणि मी हिच्याशी साध बोलत सुद्धा नाही.. एक दिवशी तो घरी आला तेव्हा मालती पाठक काकूंकडे गेली होती.. तसा हां तिच्या वस्तू तपासत  होता.. ह्याला तिची चित्रकलेची वही सापडली होती; पान चाळता चाळता तो एक चित्रावर येऊन थांबला, एका कुटुंबाच चित्र होत, आज्जी - आजोबा, शर्वरी, प्रसाद, सुमन, सुधाकर आणि मालती.... बस त्याची कोंडी फुटली होती.. नाही मालतीने  ती फोडली होती आणि तो धावत बाहर पड़ला मालतीला भेटायला आणि ही पाठक काकुंच्या घरी खेळत होती.. तिला घट्ट कुशीत घेतल आणि पटापट तिचे मुके घेतले; पाठक काकू समजून गेल्या... त्यानी मग त्याला शांत केल आणि मग तो आणि मालती दोघही घरी आले आणि दुसर्यादिवशी  बाबा आणि प्रसाद दोघांचीही माफ़ी मागून त्याने मालतिला दत्तक घेण्याचा विचार जाहिर केला... 
                            आणि पुन्हा एकदा घर आनंदाने भरून गेल.... 

- केतन सावंत 

Post a Comment

0 Comments