काल एका धुंदीतून बाहेर आलो. छे ! अजूनही त्यातच आहे. हि ह्या कादंबरीची नशा आहे ह्या स्वामी ची धुंदी आहे. पेशव्यांसारखा विषय त्यावर देसाई यांचं लिखाण ह्याहून दुग्ध शर्करा योग्य तो काय म्हणावा.. वाचताना प्रत्येक क्षण आपण जगतोय असच वाटत. पुस्तकातली सगळी पात्र आपल्या डोळ्यासमोर राहतात. माधवराव, रमाबाई, राघोभरारी, रामशात्री, रामजी काका, मैना, श्रीपती, एक नव्हे किती नाव घेतली तरी कमीच. पण खरंच आपण त्या काळात जातो असा म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत स्वामी वाचलं असेल ते पप्रत्येक जण माझ्या ह्या वाक्याशी सहमत असतीलच..
अरे काय ते लिखाण. मंत्रमुग्ध होऊन जातो आपण. झपाटून टाकत स्वामी. ना वेळेचं भान राहत ना भुकेचं. दोन दिवसात वेड्यासारखी वाचून काढली, हा मोठेपणा नाही पण हे स्वामीच वेड आहे. किती आणि कोणत्या प्रसंगाबद्दल सांगू, प्रत्येक क्षण आपण जगतो ह्या स्वामी सोबत एवढं मात्र खरं. म्हणजे आपण एखाद मंदिर पाहून त्याच्या ओढीनं पायऱ्या चढत जातो आणि आतल्या त्या परमेश्वराच्या ओढीनं भराभर पारुल टाकतो तस काहीस स्वामी वाचताना होत. आपल्या नवऱ्यासाठी त्याग, सत्ता लालसा, मातृत्व, लहानभावांवरील प्रेम, रयतेवरील माया, वयाच्या २८ व्या वर्षी आलेलं आजारपण आणि त्यातच झालेला माधवरावांचा अंत आणि रमाबाईंचा सती जाण्याचा प्रसंग. शेवट झाला कि आपोआप आपलं मस्तक त्या गजाननाचे मुखपृष्ठ असलेल्या स्वामी वर ठेवल जातं.
आता स्वामी बद्दल ची काही टिपण :
१) माधवरावांचा कार्यकाळ एकूण ११ वर्षाचा
२) ह्या कारकिर्दीत त्यांनी एकही लढाई जिंकली नाही म्हणजे शत्रूला नामोहरम करून तह करून सोडून दिले
३) रमाबाईंसोबत चा वेळ अगदीच मोजला तर काही महिन्यांची सोबत
४) काका - राघो भरारी - सतत सत्तेच्या पाठी धावणारे परंतु मनातून माधवरावांवर निरतिशय प्रेम, माया
५) हैदर सारख्या शत्रूला ३ वेळा सोडून दिले हि एक मोठी चूक, कारण वेगवेगळी आहेत.
६) माधवरावांना आपल्या मृत्यूनंतर रमा बाईंनी दाखवलेल्या सती जाण्याच्या इच्छेला माधवरावांनी दिलेल्यी मान्यता कारण पिशव्यांमध्ये सती जाण्याची प्रथा नाही.
अधीक काही सांगत नाही. पण प्रत्येकाने स्वामी कादंबरीचा अनुभव एकदा तरी घ्यावाच..

0 Comments