शिवरायांचा आठवावा प्रताप - केतन सावंत



   

                                शिवरायांचा आठवावा प्रताप  हे आज मी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं . माझं पहिलं वहील पुस्तक छोटेखानी कादंबरीचं. लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज या नावाचं वेड होत. आणि मोठा झालो तसा ह्याला अजून मोठं स्वरूप प्राप्त होत गेलं. मी पुस्तक का लिहिलं? खरतर याच उत्तर मी ठरवून नाही देऊ शकत. महाराजांबद्दल वाचताना आतून कुठेतरी वाटत होत व्यक्त व्हावं आणि सद्गुरुंच्या इच्छेने योग्य व्यक्ती जोडल्या गेल्या त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे कौस्तुभ कस्तुरे. ह्याने अक्षरश: मला हाताला धरून लिहिल्यासारखी मदत केलीय. त्यासाठी त्याचे खूप उपकार आहेत माझ्यावर. 


आता कादंबरीचं का ? कारण तार्किक विवेचन सगळेच वाचतील अशातला भाग नसतो पण गोष्ट मात्र बऱ्याच जणांना आवडते मग म्हणून गोष्टीच्या मार्गाने इतिहासाची आवड निर्माण व्हावी ह्या एकाच हेतूने हे लिखाण झालं. 


हो पण कादंबरी मध्ये दिलेला इतिहास हेच काही सत्य नव्हे. त्यासाठी संदर्भ ग्रंथ आहेत ज्यांचा आपण अभ्यास करायला हवा. आता पुस्तकाच्या विषयाकडे वळूया. 


पुस्तकाचा विषय हा अफझलखान वध ह्या प्रकरणावर आहे. आता ह्या बद्दल आपण ऐकलेलंच आहे पण ह्यात नवीन काय? तर श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात तस आपण राजांनी अफझल खान मारला हे वाचतो पण त्याच दरम्यान त्यांची प्रथम पत्नी साईबाईसाहेब ह्यांचं निधन झालं आहे, संभाजीराजे पावणेदोन वर्षाचे आहेत अशावेळी राजांची मनस्थिती काय असेल? आऊसाहेबांना काय वाटत असेल? राजे खानाला भेटण्यासाठी गड उतरत असतील तेव्हा मावळ्यांना काय वाटत असेल? ह्या सगळ्या गोष्टींना एक संवाद रूप देऊन ह्या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

हे पुस्तक तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विकत घेऊ शकता. 

- केतन सावंत 




 






Post a Comment

0 Comments