नुकतीच टिळक जयंती होऊन गेली. तसा माझा लोकमान्यांविषयी अभ्यास नाही पण 'दुर्दम्य' कादंबरीतून मला जे टिळक दिसले भावले ते मी इथे मांडणार आहे. २०१८ सालच्या दिवाळीत दादरच्या आयडियल बुक डेपो मध्ये सवलतीच्या दरात बरीच पुस्तक घेऊन आलो त्यात हे पुस्तक फक्त टिळकांवर आधारित आहे फक्त ह्या माहितीवर घेऊन आलो त्यानंतर मग ते तसंच वाचायचं राहून गेलं.
मग आता लॉकडाऊन मध्ये वाचनाला पुरेसा वेळ देता आला. मधल्या काळात 'द सेकंड लेडी' हे पुस्तक वाचून झालं. त्या आधी 'राधेय' मग 'मृत्युंजय' घेणार होतो पण म्हटलं 'दुर्दम्य' वाचूया आणि अक्षरश: एका महिन्याच्या काळात हे ७०० पानी पुस्तक वाचून पूर्ण झालं आणि ते सुद्धा १५ ऑगस्टलाच. बर आता एवढ्या लवकर वाचून झालं ह्यात माझा मोठेपणा नाही तर हि लेखकाची जादू आहे. गंगाधर गाडगीळ ह्यांनी टिळक ज्या ताकदीने लिहिले आहेत त्याला तोड नाही. इतिहासात होऊन गेलेल्या राजेमहाराजांच्या कथा लिहिताना त्यात अलंकारिकपणा आला तरी त्यावर कोणी आक्षेप घेत नाही पण अवघ्या शंभर वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टीवर एका लोकमान्यावर, आद्य क्रांतिकारक, ह्यांना लोकांसमोर मांडणं आणि त्यात सुद्धा त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागू न देता हे फार जिकिरीचं काम असत ते गाडगीळांनि खूप उत्तम केलं आहे.
एखाद्या कादंबरीचा नायक मोठा करायचा असल्यास त्यातले खलनायकही तितक्याच ताकदीने उभे करावे लागतात. टिळकांचा मंडाले मधला काळ, रानडे, आगरकर, ह्या मंडळींबद्दल असलेला राग (शुद्ध राग - सुडाची भावना नसलेला). कुठलीही गोष्ट किती मोजूनमापून करायची. लोकांना हाताशी धरून लोककार्य कस साधून घ्यायचं ह्याची हातोटी टिळकांना गवसली होती.
पुस्तक एकदा हातात घेतलं कि ते खाली ठेववसच वाटत नाही. आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळात लेखक घेऊन जातात. सत्यभामाबाईंनी टिळकांना दिलेली साथ, परांजपे, लाला लजपतराय, ह्या मंडळींनी टिळकांना केलेली मदत. गणेशोत्सव असो नाहीतर शिवजयंती उत्सव ह्या गोष्टी सुरु करणं, त्याला उत्सवाच स्वरूप आणण, त्याच महत्व जनमासनात पटवून देणं आणि सर्व धर्मियांचा एकोपा करून समाजात ब्रिटिश निर्माण करू पाहत असलेली फूट होऊ न देणं हा मूळ हेतू साध्य करणं ते सुद्धा अविरोधाच्या मार्गानं हे फार फार मोठं काम टिळकांनी केलं.
शेवटी हि देखील कादंबरीचं आहे. त्यामुळे कादंबरीत लिहिलेलं हेच सत्य असं मानणं चुकीचं. आपल्याला एखाद्या विषयाची आवड निर्माण करायची असले तर त्या विषयाची कथा, कादंबऱ्या वाचणं हे उत्तम, हि माझी वाचनाची पद्धत. परंतु हे पुस्तक वाचून तुम्हाला टिळकांविषयी त्यांच्या कार्याविषयी प्रेम निर्माण होईल हे नक्की.
हि कादंबरी तुम्ही खाली दिलेल्या अमेझॉन च्या नावावर क्लिक करून विकत घेऊ शकता.
- केतन सावंत
=========================================================================
(सूचना :- ह्या लेखामधील शब्द केतन सावंत कॉपीराईट आहे. लेखकाच्या पूर्व परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)



0 Comments